आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आठवणी:दीपिकाने केले दिवंगत अभिनेत्याचे स्मरण, व्हिडिओ शेअर करुन लिहिले - त्यांच्या मृत्यूची बातमी ऐकून मोठा धक्का बसला होता 

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • शंकर नाग यांनी 90 हून अधिक चित्रपटांमध्ये अभिनयाबरोबरच 'मालगुडी डेज' दिग्दर्शनही केले होते.

रामायणात सीतेची भूमिका साकारणारी अभिनेत्री दीपिका चिखलियाने सोशल मीडियावर एक व्हिडिओ क्लिप शेअर करत दिवंगत कन्नड अभिनेता शंकर नाग यांची आठवण काढली. दीपिकाने शेअर केलेला व्हिडिओ तिच्याच कन्नड चित्रपटातील गाण्याचा आहे. तिने सांगितले की, या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाल्यानंतर माझ्या सहकलाकाराचे निधन झाले होते आणि मी बरेच दिवस या धक्क्यातून सावरू शकले नव्हते. व्हिडिओ शेअर करताना दीपिका म्हणाली, 'हे गाणे' होस्सा जीवन 'या  चित्रपटातील आहे.. या चित्रपटाचे शेवटचे शेड्युल संपरल्यानंतर माझ्या सह-अभिनेत्याचा अपघातात मृत्यू झाला होता. त्याच्या जाण्याने मला खूप मोठा धक्का बसला आणि मी बराच काळ या धक्क्यातून स्वतःला सावरु शकले नव्हते. नंतर हा चित्रपट सुपरहिट ठरला... पण आमचे मोठे नुकसान झाले होते... सहकलाकार... शंकर नाग.'

  • शंकर नाग हे मालगुडी डेजचे दिग्दर्शक होते

दीपिकाने ज्या शंकर नाग यांचा उल्लेख केला ते कन्नड चित्रपटांचे सुप्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक-निर्माता आणि पटकथा लेखक होते. 30 सप्टेंबर 1990 रोजी त्यांचे वयाच्या अवघ्या 36 व्या वर्षी निधन झाले. जवळपास 12 वर्षांच्या चित्रपट कारकीर्दीत त्यांनी 90 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले. 1992 मध्ये त्यांचा शेवटचा चित्रपट प्रदर्शित झाला होता. दूरदर्शनवर प्रसारित झालेल्या मालगूडी डेज या प्रसिद्ध मालिकेचे दिग्दर्शनही नाग यांनी केले होते.

  • दीपिकाने 20 हून अधिक चित्रपट केले

दीपिकाचा हा चित्रपट 1990 मध्ये रिलीज झाला होता. त्याचे दिग्दर्शन एचआर भार्गव यांनी केले तर निर्माते एस. शैलेंद्र बाबू होते.  तर, दीपिकाने ज्या गाण्याची व्हिडिओ क्लिप शेअर केली त्या गाण्याचे बोल 'लाली लाली लाली जो...' असे आहेत. हे गाणे एसपी बालसुब्रमण्यम आणि मंजुला गुरुराज यांनी गायले होते. तर हेमसलेखा गाण्याचे गीतकार आणि संगीतकार होते. दीपिकाने तिच्या फिल्मी करिअरमध्ये सुमारे 24 चित्रपटांत काम केले आहे. त्यापैकी काही गुजराती, मल्याळम, कन्नड, तामिळ आणि तेलगू भाषांमध्ये आहेत.

बातम्या आणखी आहेत...