आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘भुज : प्राइड ऑफ इंडिया’ विषयी खास डिटेल्स:दीर्घकाळानंतर विनोदी शैलीतून बाहेर पडत अ‍ॅक्शन करणार अजय; घेणार नाही डुप्लिकेटची मदत

अमित कर्ण2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सीटवरून पडल्यानंतरही चालवत राहिला 70 च्या दशकातील अवजड ट्रक

आपल्या आगामी ‘भुज : द प्राइड ऑफ इंडिया’ चित्रपटात अजय देवगण पुन्हा एकदा आपल्या अॅक्शन रूपात दिसणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक अभिषेक दुधैयाने सांगितले, हा एक अ‍ॅक्शनवर आधारित चित्रपट आहे. यात ५० टक्के व्हीएफएक्सचा वापर केला आहे तरीही यातील बरेच दृश्य अजयने स्वत: केले आहेत. यात त्याने डुप्लिकेटची मदत घेतली नाही. एका दृश्यात अजयने एक अवजड ट्रक चालवला आणि आपल्या शैलीत त्याच्या गोल चकराही मारल्या. तो ट्रक आजच्या काळातील नसून ७०च्या दशकातील ट्रक होता. सावधगिरी म्हणून आम्ही अजयला वायरने बांधून ठेवले होते मात्र ट्रक वळवताना वायर तुटला आणि अजय सीटच्या खाली पडला. तरीही त्याने ट्रक ९० डिग्रीपर्यंत सोडूनच श्वास घेतला.

६ फुटांवरील लॅम्पपोस्टवर ठेवलेले झूमर एकाच वेळी विझविले
चित्रपटाच्या एका दृश्यात पाकिस्तानी फायटर विमान जेव्हा भूज विमानतळावर हल्ला करते, तेव्हा त्यापासून वाचण्यासाठी भारतीय लष्कर इमारती आणि लँप पोस्टवर जळत असलेले झूमर विझवतात. अजयचे पात्रदेखील सहा फूट उंच लँपपोस्टवर ठेवलेले ते झूमर पायाने दगड मारून विझवते. ते दृश्य घेण्यासाठी आमचे फाइट मास्टर पीटरने बऱ्याचदा प्रयत्न केला मात्र ते झूमर फोडू शकले नाही. दिग्दर्शक अभिषेक यांनीदेखील ३० वेळेस तसे करुन पाहिले, मात्र ते दृश्य त्यांच्याकडूनही झाले नाही. तेव्हा निर्मात्यांनी अजयला हे दृश्य समजावून सांगितले, त्यांनी एकाच शॉटमध्ये पायाने दगड मारून झूमर विझवले.

शूटिंगसाठी बनवण्यात आली होती १५ लढाऊ विमाने, १५ टँक
हा चित्रपट १९७१ मध्ये झालेल्या भारत आणि पाकिस्तानच्या युद्धावर आधारित आहे. निर्मात्यांनी यासाठी १५ भारतीय आणि १५ पाकिस्तानी लढाऊ विमानदेखील डिझाइन केले होते. प्रॉडक्शनच्या टीमने इतक्या मोठ्या संख्येत टँक्स क्रिएट केले की ते खरे टँक वाटत होते. शिवाय भारतीय लष्करानेदेखील निर्मात्यांना मूळ टँक उपलब्ध करुन दिले होते.

सेटच्या बाहेर स्थानिकांनी लावली होती दुकाने
निर्मात्यांनी चित्रपटावर बराच खर्च केला आहे. मांडवीच्या सेटवर सुमारे १२५० लोकांची उपस्थिती होती. या युनिटमध्ये मद्रासचे १८० फाइट मास्टर, ३०० महिला ज्युनिअर आर्टिस्ट आणि २५० क्रू मेंबर्स सहभागी झाले होते. इतक्या लोकांची गर्दी पाहून सेटच्या बाहेर मांडवीच्या स्थानिक लोकांनी खाण्याची आणि वस्तूंची दुकाने लावली होती. त्या दुकानांतून अनेक कलाकारांनी शॉपिंगदेखील केली.

बातम्या आणखी आहेत...