आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

इनसाइड डिटेल:दिग्दर्शक अनीस बज्मीने शेअर केली 'भूलभुलैया 2'ची माहिती, मनालीतून शूटिंग करून परतले कार्तिक-कियारा; आता उरले 40 दिवसांचे शेड्यूल

उमेशकुमार उपाध्यायएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • दिग्दर्शक अनीस बज्मींनी सांगितले, कोरोनामुळे वाढले आमच्या चित्रपटाचे बजेट

दिग्दर्शक अनीस बज्मी सध्या ‘भूलभुलैया 2’ची शूटिंग पूर्ण करण्यात व्यग्र आहेत. कार्तिक आर्यन आणि कियारा आडवाणी अभिनीत या चित्रपटाचे 40 दिवसांचे शूटिंग शे‌ड्यूल उरले आहे. ते मुंबईत सुरू आहे. दोन्ही ताऱ्यांनी नुकतीच कुलू, मनालीमध्ये काही दृश्ये पूर्ण केली आहेत. चित्रपटाच्या इतर माहितीविषयी उमेशकुमार उपाध्यायने अनीस यांच्याशी केलेली खास बातचीत...

दिग्दर्शक अनीस यांनी सांगितले, आम्ही या चित्रपटाचे सतत शूटिंग करत आहोत. नुकतीच संपूर्ण टीम शूटिंग करुन कुल्लू-मनालीहून परत आली आहे. पाच दिवसांच्या शूटिंगच्या या वेळापत्रकात कलाकारांनी तेथे 9 डिग्रीमध्ये शूटिंग केली. अजूनही चित्रपटाची 40 दिवसांची शूटिंग उरली आहे. यानंतरही जे छोटे-मोठे काम शिल्लक राहिल ते नंतर केले जातील. असो, शूटिंग करायला आम्हाला खूप उशीर झाला. हे वर्षे पूर्ण कोरोनामुळे बिघडले.

आतापर्यंत टीमने कुल्लू-मनाली आणि लखनऊमध्ये शूटिंग केले आहे. बाकीची शूटिंगही येथे पूर्ण केली जाईल. आता मुंबईच्या वेगवेगळ्या भागात दहिसर, मीरा रोड, हिरानंदानी पवई आणि फिल्म सिटीमध्ये 7 ते 8 सेट लागलेले आहेत. येथे सर्वच सीन शूट झाल्यानंतर गाणेदेखील शूट होतील. आम्ही हा चित्रपट 19 नोव्हेंबर रोजी रिलीज करण्याची योजना आखत आहोत.

पहिल्या चित्रपटापेक्षा वेगळी ठेवली कथा
चित्रपटाच्या कथेविषयी अनीसने सांगितले, या चित्रपटाची तुलना भूलभुलैयाशी होईल, याची आम्हाला कल्पना होती. त्यामुळेच आम्ही चित्रपटाची कथा थोडी वेगळी ठेवली. जेणेकरून लोकांना हा पहिला चित्रपट वाटू नये. आधीच्या चित्रपटात हॉरर-कॉमेडी होती, यातही आहे. शिवाय एक लव्ह स्टोरी देखील आहे. कथा फक्त वेगळी आहे.

तब्बूच्या पात्राचे रहस्य
तब्बूविषयी अनीसला विचारले, तब्बू भुताच्या भूमिकेत असल्याची चर्चा आहे? ते म्हणाले, नाही, असे काहीही नाही. लोक या चित्रपटाविषयी काहीही अनुमान लावतात. आम्ही शूटिंग सुरू केले तेव्हा कुणी म्हणाले, हा चित्रपट पूर्ण होणार नाही. त्यामुळे लोक फक्त अंदाज लावत आहेत. एवढेच सांगतो, तबुची भूमिका खूप वेगळी आहे, आतापर्यंत तिने अशी भूमिका साकारली नाही.

कोरोनामुळे वाढले आमच्या चित्रपटाचे बजेट
बजेटविषयी बोलायचे झाले तर कोरोनामुळे चित्रपटावर परिणाम झाला. आधी हा चित्रपट जुलै 2020 मध्ये रिलीज होणार होता. मात्र आता नोव्हेंबर 2021 मध्ये होणार आहे. कोरोनामुळे याची निर्मितीचा खर्च वाढला आहे. शिवाय आम्ही कोरोनाच्या दिशानिर्देशचे पालन करतच शूटिंग करत आलो आहोत. सेटवर सॅनेटाइज करणे, कोविड तपासणी करणे इतरही काही गोष्टी आहेत. त्यामुळे निर्मितीचा खर्च वाढला आहे.

बातम्या आणखी आहेत...