आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबॉलिवूडमध्ये सध्या खळबळ उडाली आहे. कारण आयकर विभाग अर्थातच इन्कम टॅक्सने बॉलिवूडकडे आता आपला मोर्चा वळवला आहे. आयकर विभागाच्या पथकांनी बॉलिवूडचा प्रसिद्ध दिग्दर्शक-निर्माता अनुराग कश्यप, अभिनेत्री तापसी पन्नू आणि निर्माता मधु मंटेना यांच्या मुंबईतील मालमत्तावर छापे टाकत झाडाझडती सुरू केली आहे. अनुराग, तापसी आणि मधु मंटेना बरोबरच विकास बहल यांच्या घरीही आयकरने छापे टाकल्याचे वृत्त आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ‘फँटम फिल्म’शी संबंधित लोकांच्या घरांवर या धाडी टाकण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर मधू मंटेना यांची कंपनी ‘क्वान’ यांच्या कार्यालयावरही छापे मारण्यात आले. कर चुकवल्याच्या आरोपाखाली हे छापे टाकण्यात आले असून मुंबईतील तब्बल 22 ठिकाणांची झाडाझडती आयकर विभागाकडून घेतली जात आहे.
‘फँटम फिल्म’ आणि 'क्वान' या कंपन्यांशी संबंधित असलेल्यांवर हे छापे टाकण्यात आले. त्यांनी कर चोरी केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आल्याचे आयकर विभागाने म्हटले आहे. फँटम फिल्म्स चित्रपट निर्मिती आणि त्याचे वितरण करण्याचे काम करते. अनुराग कश्यप, दिग्दर्शक विक्रमादित्य मोटवाणे, निर्माता मधु मंटेना आणि विकास बहल यांनी ही कंपनी 2011 मध्ये सुरू केली होती. सहसंस्थापक विकास बहलवर लैंगिक शोषणाचा आरोप झाल्यानंतर कंपनी 2018 मध्ये बंद करण्यात आली होती. या छाप्यात आयकर विभागाला काय मिळाले, ते थोड्याच वेळात स्पष्ट होईल
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.