आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Entertainment
  • Bollywood
  • Director Harish Vyas Said 'Hariom' Will Be Based On The Story Of Father And Son, The Film Will Be Shot For 20 Days In Bhopal And 10 Days In Banaras

खास बातचीत:दिग्दर्शक हरीश व्यास म्हणाले - बाप-लेकाच्या कथेवर आधारित असेल 'हरिओम', 20 दिवस भोपाळमध्ये तर 10 दिवस काशीमध्ये होणार शूट

उमेश कुमार उपाध्यायएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • रिअल लोकेशनवर शूटिंग केले जाईल

नुकताच रिलीज झालेला 'हम भी अकेले तुम भी अकेले’ फेम दिग्दर्शक हरीश व्यास आता आपला आगामी चित्रपट 'हरिओम’वर काम सुरू करणार आहे. यात झरीन खान मुख्य भूमिकेत होती. या चित्रपटाची कथा बाप-लेकाच्या जीवनावर आधारित आहे. यात अन्नू कपूर एका अशा वडिलांची भूमिका साकारणार आहे. तो एक ज्योतिषीदेखील असतो. तर मुलाच्या भूमिकेत अंशुमन झा असेल. यावर पुढच्या महिन्यात काम सुरू होणार आहे. याचे शूटिंग भोपाळ आणि काशीमध्ये होणार आहे.

रिअल लोकेशनवर शूटिंग केले जाईल
चित्रपटाविषयी हरीश यांनी सांगितले, 'आम्ही याचे शूटिंग भोपाळ आणि काशीच्या रिअल लोकेशनवर काम करणार आहोत जेणेकरुन कथा मूळ वाटावी. तेथे घर आणि वस्तीत जाऊन शूटिंग करणार आहोत. आमचे सर्व लोकेशन रिअल असतील. याचे शूटिंग शेड्यूल कमीत कमी 30 दिवसाचे असेल. पात्र भोपाळचे दाखवल्यामुळे तेथे 20 दिवस आणि काशीमध्ये 10 दिवसाचे शूटिंग केले जाईल.'

ते पुढे म्हणाले, सध्या चित्रपटावर काम सुरु करु तेव्हा सहा महिन्यांनी चित्रपट तयार असेल. सर्वकाही तयार आहे. फक्त चित्रपटाचा क्लायमॅक्स लिहणे बाकी आहे. लवकरच तेही काम पूर्ण होईल. पुढील दोन महिन्यांत चित्रपट फ्लोअरवर येईल. त्यावेळी थिएटरची परिस्थिती काय असेल, यावर चित्रपटाचे प्रदर्शन अवलंबून राहिले. तेव्हाच चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित करावा की तो ओटीटीवर आणावा, याचा निर्णय घेतला जाईल.

बातम्या आणखी आहेत...