आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोना नंतरचे हॉलिवूड:न्यूझीलंडमध्ये 'अवतार -2'च्या शूटिंग सेटवर जाण्यापूर्वी दिग्दर्शक जेम्स कॅमेरॉन 14 दिवसांसाठी झाले क्वारंटाईन

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • 'अवतार' या चित्रपटाच्या चार सिक्वेलचे झाले आहे प्लानिंग

2009 मध्ये प्रदर्शित झालेल्या  'अवतार' या सायन्स फिक्शन चित्रपटाच्या सिक्वेलचे चित्रीकरण लवकरच सुरु होणार आहे. यासाठी चित्रपटाचे लेखक आणि दिग्दर्शक जेम्स कॅमेरॉन चित्रपटाच्या निर्मात्यासह न्यूझीलंडला पोहोचले आहेत. परंतु सध्याच्या कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर या दोघांनीही सरकारचा आदेश पाळत 14 दिवस क्वारंटाईन राहावे लागणार आहे.

जॉन यांनी फोटो शेअर केला

वेलिंग्टन विमानतळावरून दोघांचे फोटो शेअर करत सह-निर्माता जॉन लिंडाऊ यांनी इंस्टाग्रामवर ही माहिती दिली. चित्रपटाचे शूटिंग मे महिन्यात सुरू होणार होते, परंतु जगभरात कोरोना विषाणूच्या संसर्गाची प्रकरणे समोर आल्यानंतर हे थांबविण्यात आले. जगात कोरोना संक्रमित लोकांची संख्या सुमारे 65 लाखांवर पोहोचली आहे. या काळात एकूण 30 लाख 83 हजार 650 लोक या आजारातून बरे झाले आहेत. तर 3 लाख 82 हजार 914 लोकांचा मृत्यू झाला आहे.

चार सिक्वेलचे झाले आहे प्लानिंग

अवतारचे एकूण चार सिक्वेलचे नियोजन करण्यात आले आहे. अवतार 2 हा पहिला सिक्वेल आहे. याचे शूटिंग डिसेंबर 2017 मध्ये होणार होते आणि 2021 मध्ये प्रदर्शित होणार होता. या चित्रपटाचा तिसरा सिक्वेल 2023 मध्ये, चौथा भाग 2025 मध्ये आणि पाचवा भाग डिसेंबर 2027 मध्ये प्रदर्शित करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. 'अवतार'च्या पहिल्या भागामध्ये सॅम वॉर्थिंग्टन, झो साल्डाना, स्टीफन लँग, मिशेल रॉड्रिग्ज जोएल, डेव्हिड मूर मुख्य भूमिकेत होते. 

बातम्या आणखी आहेत...