आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मधुबालाची 52 वी पुण्यतिथी:मधुबालाच्या स्मितहास्यामुळे अडचणीत आले होते दिग्दर्शक के. आसिफ, 7 दिवस थांबवावे लागले होते 'मुगल-ए-आजम'चे चित्रीकरण

7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • ही सौंदर्यवती दुर्दैवाने अल्पायुषी ठरली.

मधुबालाला भारतीय सिनेसृष्टीतील सर्वात सुंदर अभिनेत्री म्हणून ओळखले जाते. बॉलिवूडमध्ये आजवर कितीतरी सुंदर अभिनेत्री आल्या. मात्र मधुबालाच्या सौंदर्याची भूरळ आजही प्रेक्षकांच्या मनावर कायम आहे. जणू सौंदर्याचे दुसरे नावच मधुबाला आहे. मधुबाला यांचा जन्म 14 फेब्रुवारी 1933 रोजी झाला होता. वयाच्या केवळ 36व्या वर्षी त्यांनी या जगाचा निरोप घेतला. 23 फेब्रुवारी 1969 रोजी त्यांचे निधन झाले होते.

स्मितहास्याचे लाखो चाहते
मधुबाला यांनी करोडो लोकांच्या हृदयावर राज्य केले. मात्र ही सौंदर्यवती दुर्दैवाने अल्पायुषी ठरली. मधुबाला हे हिंदी चित्रपटसृष्टीला पडलेले एक सुंदर स्वप्न आहे. आज त्या आपल्यात नसल्या तरी त्यांच्या सौंदर्याचे व मधाळ हास्याचे आजही लाखो चाहते आहेत. व्हिनस या नावाने मधुबाला हिंदी चित्रपटसृष्टीत प्रसिद्ध होत्या. त्या कायम हसतमुख हसायच्या. पडद्यावर मात्र त्यांनी आपल्या स्वभावाच्या विरुद्ध म्हणजे गंभीर भूमिका साकारल्या.

मधुबाला यांच्या स्मितहास्यामुळे अडचणीत आले होते निर्माता-दिग्दर्शक

मधुबाला यांच्याशी संबंधित एक अतिशय रंजक किस्सा आहे. मधुबाला यांच्या स्मितहास्यामुळे एकदा निर्माता-दिग्दर्शक अडचणीत सापडले होते. निर्माता-दिग्दर्शक के. आसीफ यांना 1960 मध्ये ‘मुगल-ए-आजम’ हा चित्रपट बनवताना अडचणीचा सामना करावा लागला होता.

'मुगल-ए-आजम' चित्रपटात मधुबाला यांनी अनारकलीची गंभीर भूमिका साकारली होती, हे आपल्या सर्वांनाच ठाऊक आहे. मात्र या चित्रपटाशी निगडीत एक गोष्ट फारशी कुणाला ठाऊक नसावी. मधुबाला यांच्या स्मितहास्यामुळे तब्बल सात दिवस 'मुगल-ए-आजम' चित्रपटाचे चित्रीकरण होऊ शकले नव्हते.

चित्रपटात एक दृश्य होते ज्यामध्ये अकबर (पृथ्वीराज कपूर), त्यांची पत्नी महारानी जोधाबाई (दुर्गा खोटे) आणि सलीम (दिलीप कुमार) यांच्यासमोर अनारकली (मधुबाला) उभी असते. या सीनमध्ये मधुबाला यांना चेह-यावर दुःखद भाव आणायचे होते. पण या दृश्यात त्या वारंवार हसत होत्या. त्यामुळे शॉट ओके होत नव्हता. हा क्रम एक दोन नव्हे तर सलग सात दिवस सुरु राहिला. त्यामुळे सात दिवस चित्रपटाचे शूटिंगच होऊ शकले नव्हते. 23 फेब्रुवारी 1969 रोजी वयाच्या अवघ्या 36 व्या वर्षी हृदयविकाराच्या आजाराने मधुबाला यांनी या जगाचा कायमचा निरोप घेतला होता.

बातम्या आणखी आहेत...