आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रिअ‍ॅक्शन:'शमशेरा'च्या पोस्टर लीकवर दिग्दर्शक करण मल्होत्राची प्रतिक्रिया, म्हणाले - चाहत्यांनी दिलेली दाद आनंद देणारी

12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पोस्टरला मिळालेल्या प्रतिसादाने खूश आहेत दिग्दर्शक

अभिनेता रणबीर कपूरच्या आगामी 'शमशेरा' या चित्रपटाचे पोस्टर लीक झाल्यानंतर आता दिग्दर्शक करण मल्होत्राची प्रतिक्रिया समोर आली आहे. रणबीरच्या चाहत्यांना त्याचा लूक आणि पोस्टर आवडल्याने खूप आनंद झाल्याची प्रतिक्रिया करण यांनी दिली आहे. तसेच 'शमशेरा'ची टीम पुढील आठवड्यापासून चित्रपटाच्या प्रमोशनला सुरुवात करणार असल्याचा खुलासाही त्यांनी केला आहे.

पोस्टरला मिळालेल्या प्रतिसादाने खूश आहेत दिग्दर्शक
'शमशेरा'बद्दल बोलताना करण म्हणाले, “आपण आपल्या आयुष्याचे नियोजन करत असतो जेणेकरून आपल्याला गोष्टी योग्य वेळी मिळू शकतील. पण त्या नियोजनात आपण हे विसरतो की, या विश्वात घडणा-या सर्व गोष्टी नेहमी ठरवलेल्या असतात. अशा प्रकारची घटना याचे उत्तम उदाहारण आहे. रणबीर कपूरच्या चाहत्यांना पोस्टर आणि त्याचा लूक आवडला याचा मला मनापासून खूप आनंद झाला आहे."

पुढील आठवड्यापासून सुरु होणार प्रमोशन
दिग्दर्शक पुढे म्हणाले, "आम्हाला पुढील आठवड्यापासून आमच्या चित्रपटाच्या प्रमोशनवर काम सुरु करायचे आहे. परंतु चाहते या चित्रपटासाठी उत्सुक दिसत आहेत. आम्ही या चित्रपटावर ब-याच काळापासून काम करत आहेत. आणि प्रेक्षकांनाही बरीच वाट बघितली आहे. रणबीर 4 वर्षांनी सिनेमात पुनरागमन करत आहे. त्यामुळे चाहत्यांसाठी त्यांचा उत्साह रोखणे कठीण होईल. पोस्टरला मिळालेल्या प्रतिसादाने मी खूप आनंदी आहे," असे करण मल्होत्रा म्हणाले.

22 जुलैला रिलीज होणार आहे हा चित्रपट
चित्रपटाची कथा एका गुलाम व्यक्तीची आहे. तो आपल्या टोळीसाठी गुलाम ते नेता आणि नेता ते लेजेंड बनतो. तो आपल्या समजाच्या स्वातंत्र्यासाठी आणि अभिमानासाठी लढतो. करण दिग्दर्शित या चित्रपटाची निर्मिती आदित्य चोप्रा यांनी केली आहे. हिंदी, तामिळ आणि तेलुगू अशा तीन भाषांमध्ये हा चित्रपट 22 जुलै रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे.

रणबीर कपूरचे आगामी प्रोजेक्ट्स
रणबीरच्या आगामी प्रोजेक्ट्समध्ये, लव रंजनचा अद्याप नाव न ठरलेला रोमँटिक कॉमेडी चित्रपट आहे. ज्यामध्ये तो श्रद्धा कपूरसोबत दिसणार आहे. याशिवाय रणबीर अयान मुखर्जीच्या 'ब्रह्मास्त्र पार्ट वन' या चित्रपटाचाही एक भाग आहे. या चित्रपटात आलिया भट्ट, अमिताभ बच्चन, नागार्जुन आणि मौनी रॉय यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.

बातम्या आणखी आहेत...