आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लॉकडाऊन:इंडस्ट्रीच्या सद्य:स्थितीबाबत निखिल अडवाणी म्हणाले  - 'लॉकडाऊननंतर डिजिटल माध्यमावर रिलीज होऊ शकतात चित्रपट'

अमित कर्ण. मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • निखिल अडवाणी म्हणाले - निर्माते घाबरले नाहीत अशी परिस्थिती दिसत नाही. ज्या दिवशी लॉकडाऊन संपेल त्या दिवशी परिस्थिती सामान्य होईल.

लॉकडाऊनच्या काळात चित्रपटगृह आणि शूटिंगदेखील पूर्णपणे लॉक आहे. लॉकडाऊन संपल्यानंतर चित्रपटगृहांची कशी स्थिती असेल, निर्माते डिजिटल माध्यमांवर चित्रपट रिलीज करतील का ? अशा अनेक विषयांवर दिव्य मराठीने दिग्दर्शक निखिल अडवाणी यांच्यासोबत चर्चा केली.

  • पुढे काय होईल ? निर्माते घाबरलेत का ? मोठे बजेट राहील का ?

निर्माते घाबरले नाहीत अशी परिस्थिती दिसत नाही. ज्या दिवशी लॉकडाऊन संपेल त्या दिवशी परिस्थिती सामान्य होईल. पुन्हा सर्व काही सुरळीत सुरू होईल. पुढच्या वर्षी जे चित्रपट, वेब शो आणि टीव्ही शो येणार आहेत त्यावर आधीच कोट्यवधींची गुंतवणूक करण्यात आली आहे. त्यामुळे ते पूर्वीसारखेच प्रदर्शित करण्यात येतील. मात्र लॉकडाऊननंतर थोडाफार फरक पडेल, दुसरे काही होणार नाही, इंडस्ट्रीतील लोक आधीही अ‍ॅडजेस्ट करत होते, पुढेही करत राहतीलच.

  • तुम्हीदेखील ‘मुगल’ हा वेब शो बनवत आहात ?

लोक विचारही करू शकणार नाहीत त्यापेक्षा महागडा वेब शो आहे. अनेक मोगल बादशहांवर आधारित आहे. यातून आम्ही बाबर ते औरंगजेबची कथा दाखवणार आहोत. यात सहा मोगल बादशहांची कथा दाखवण्यात येईल. एका बादशहावर 8 भाग बनवले जातील.

  • हिंदी चित्रपट डिजिटल माध्यमांवर रिलीज होतील का ?

याआधीही डिजिटल माध्यावर चित्रपट रिलीज होत होतेच. आता कोविड-19 मुळे त्यात वाढ झाली आहे असे म्हणता येईल. या काळात जे निर्माते डिजिटल माध्यमांचे महत्त्व समजणार नाहीत ते या स्पर्धेत मागेच राहतील. याआधीही अनेक लोक डिजिटल माध्यमांवर चित्रपट रिलीज करत होते.

  • डिजिटल माध्यमांवर थेट चित्रपट रिलीज झाल्यानंतर स्टार कल्चरमध्ये बदल होईल ?

हो, बदल तर होईलच. अक्षय कुमार, अजय देवगण, शाहरुख खान, सलमान खान यांनी काही गुंतवणूक केली असेल तर प्रेक्षकांना जास्त पैसे द्यावे लागतील. त्या बदलाचे नाव ‘पे पर व्यू’ असे राहील. प्रेक्षकांच्या मोबाइलवरच चित्रपटाचे ट्रेलर येईल आणि तुम्हाला जर ते पाहायचे असेल तर त्याच्यासाठी एक्सट्रा पैसे द्यावे लागतील.  

बातम्या आणखी आहेत...