आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रकृती गंभीर:लय भारी, दृश्यमचे दिग्दर्शक निशीकांत कामत यांची प्रकृती चिंताजनक; यकृताच्या गंभीर आजारामुळे हैदराबादच्या रुग्णालयात दाखल

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

मराठी सिनेसृष्टीतील ब्लॉकबस्टर लय भारीचे दिग्दर्शक निशीकांत कामत यांची प्रकृती चिंताजनक आहे. यकृताच्या गंभीर आजारामुळे त्यांची प्रकृती अचानक बिघडली. त्यांना पुढील उपचारासाठी हैदराबादच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. निशीकांत कामत यांना डोंबीवली फास्ट, लय भारी आणि सातच्या आत घरात या मराठी चित्रपटांसह दृश्यम, फोर्स, फोर्स, रॉकी हँडसम आणि मदारी या चित्रपटांचे दिग्दर्शक म्हणून ओळखले जाते.

डोंबिवली फास्ट या मराठी चित्रपटाच्या माध्यमातून त्यांनी चित्रपट सृष्टीत पदार्पण केले होते. त्यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट सुपरहिट ठरलला होता. यानंतर मुंबई साखळी बॉम्बस्फोटावर आधारित मुंबई मेरी जान या हिंदी चित्रपटाचे त्यांनी दिग्दर्शन केले. यानंतर त्यांना दृश्यम, मदारी, फुगे अशा चित्रपटांच्या ऑफर मिळाल्या.

रॉकी हँडसममध्ये साकारली खलनायकाची भूमिका

त्यांनी जॉन अब्राहमच्या रॉकी हँडसम या चित्रपटात व्हिलेनची भूमिका साकारली होती. त्यांनी अनिल कपूरचा मुलगा हर्षवर्धन कपूरसोबत भावेश जोशी या चित्रपटात देखील काम केले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, निशीकांत सध्या आपला आगामी चित्रपट दरबारसाठी काम करत होते. त्यांचा हा चित्रपट 2022 मध्ये रिलीज होऊ शकतो.

बातम्या आणखी आहेत...