आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ओम राऊत यांच्याशी खास बातचित:'आदिपुरुष'चे दिग्दर्शक म्हणाले - चित्रपटाच्या रिसर्चसाठी 19 वर्षे लागली, 7000 वर्षांपूर्वीची कहाणी दाखवणे सोपे नाही

ज्योती शर्मा21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 3 डी तंत्रज्ञान हा या चित्रपटाचा आत्मा आहे, रावणचे पात्र सर्वात आव्हानात्मक आहे

प्रभास स्टारर 'आदिपुरुष' या चित्रपटाचे चित्रीकरण अलीकडेच मुंबईतील एका स्टुडिओमध्ये सुरु होते. याकाळात सुमारे 200 लोकांचा क्रू सेटवर उपस्थित असायचा. चित्रपटाचे दिग्दर्शक ओम राऊत कोविडच्या सर्व मार्गदर्शक सूचनांचे पालन करत चित्रीकरण करत होते. निर्मात्यांची शूटिंग थांबवण्याच्या विचारात नव्हते. परंतु कोरोनाच्या दुस-या लाटेने अक्षरशः हाहाकार माजवला आहे. दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे सरकारने 1 मे पर्यंत महाराष्ट्रात लॉकडाउन जाहीर केला आहे. याकाळात सर्व प्रकारच्या चित्रीकरणाला बंदी घालण्यात आली आहे. याचा फटका आदिपुरुष या चित्रपटालाही बसला आहे. मुंबईत सुरु असलेले चित्रपटाचे चित्रीकरण आता बंद आहे. दिव्य मराठीसोबतच्या खास संभाषणात राऊत यांनी चित्रपटाशी संबंधित खास गोष्टी शेअर केल्या आहेत.

3 डी तंत्रज्ञान हा या चित्रपटाचा आत्मा आहे, रावणचे पात्र सर्वात आव्हानात्मक आहे
चित्रपटाच्या प्लानिंगविषयी बोलताना ओम म्हणाले, 'आम्ही या चित्रपटाचे शूटिंग 3 डी तंत्रज्ञानाने करीत आहोत. आम्ही 'तान्हाजी...' मध्येही या प्रकारचे तंत्र वापरले होते. 'आदिपुरुष' मध्ये आम्ही त्यापेक्षा कित्येक पटीने काम करत आहोत. आम्हाला सात हजार वर्षांपूर्वीची पृथ्वी दर्शवायची आहे. रावण हे जगातील सर्वात कठीण पात्र आहे. यासाठी मी सैफची निवड केली कारण तो प्रत्येक पात्र पूर्ण उत्कटतेने करतो. रावणचे पात्र निगेटिव्ह असून 'तान्हाजी ...' मधील देखील सैफचे पात्र निगेटिव्ह होते.'

रिअल लोकेशनवर शूट करण्याची कोणतीही योजना नव्हती
चित्रपटाच्या संशोधनाला 19 वर्षांचा कालावधी लागला, असे ओम यांनी सांगितले. ते म्हणतात, 'सात हजार वर्षांपूर्वीची पृथ्वी दाखवणे सोपे नाही. आम्ही असे वातावरण तयार करू शकणार नाही. चित्रपटाच्या कथेनुसार आम्ही रिअल लोकेशनवर चित्रीत करु शकत नाही. म्हणून, पुर्वीपासूनच रिअल लोकेशनवर शूट करण्याचे कोणतेही नियोजन नव्हते. मी ज्या प्रकारची स्क्रिप्ट आणि सीन लिहितो, त्यासाठी बरेच नियोजन असते. आम्ही आमच्या नियोजनानुसार काम करत आहोत. आम्ही पहिल्या दिवसापासून या चित्रपटाचे चित्रीकरण स्टुडिओमध्ये करणार होतो. आम्ही कोणतेही बदल करून आपले नियोजन आणि दृष्टीकोन बदलू शकत नाही. मात्र, करोनामुळे स्टुडिओमध्ये देखील शूट करणे आता कठीण झाले आहे.'

इतिहास आणि पौराणिक कथांमध्ये पुर्वीपासूनच रस आहे
ओम पुढे सांगतात, 'मला नेहमीच इतिहास आणि पौराणिक कथांमध्ये खूप रस आहे. बर्‍याच वेळा असे घडते की विशिष्ट कथा किंवा पात्र वाचताना आपल्याला त्या खूप आवडतात. माझ्या लहानपणी माझ्या आजोबा आणि वडिलांकडून ऐकलेल्या कथांमुळे मी खूप प्रभावित झालो आहे, बर्‍याच वेळा असे वाटते की आपण या सर्वोत्कृष्ट कथांना नवीन मार्गाने लोकांपर्यंत घेऊन जायला हवे. यामुळेच मला अशा विषयांवर काम करण्याची तीव्र इच्छा आहे. आता मी 'आदिपुरुष' वर लक्ष केंद्रित करत आहे. ता प्रोजेक्ट लवकरच पूर्ण करायचा आहे," असे ओम राऊत म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...