आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आगामी:दिग्दर्शक राजामौली म्हणाले, ‘आर.आर.आर’साठी अजयसारखाच अभिनेता मला हवा होता 

बॉलिवूड डेस्क3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अजय या चित्रपटात एका पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसणार आहे

अजय देवगण आिण एसएस राजामौली ‘आर.आर.आर.’ चित्रपटासाठी एकत्र आले आहेत. दोघांनाही एकत्र काम करायचे होते. अजय आिण काजोलने पूर्वी राजामौली यांच्या ईगा (मक्खी)चित्रपटासाठी व्हॉइस ओवर दिला होता. अजयसोबत काम करण्याबाबत राजामौली म्हणतात...‘अजय खूपच नम्र व्यक्ती आहे. त्याचे पात्र चित्रपटासाठी खूप महत्त्वपूर्ण आहे. मला “आर.आर.आर.’ साठी  अशाच अभिनेत्याची गरज होती. ज्याचा चेहरा आिण प्रत्येक शब्दांत प्रामाणिकपणा आिण निष्ठा झळकते. तो काय म्हणतो किंवा काय करतो  यावर संपूर्ण देशाचा विश्वास आहे. मला असे वाटते की, या चित्रपटात कोणता अभिनेता योग्य आहे असे विचारले तर १० ते ९ लोक अजय देवगणचे नाव घेतील. अजयने या पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेसाठी होकार दिला म्हणून मी खूप आनंदी आहे. “

बातम्या आणखी आहेत...