आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अवॉर्डचा आनंद:'दिल्ली क्राइम'च्या विजयावर दिग्दर्शक रिची म्हणाले - हा विजय यामागे अनेक वर्षे कष्ट घेत असलेल्या शेकडो लोकांच्या मेहनतीला सलाम आहे

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • या सीरिजला एमी हा पुरस्कार मिळेल, असा कधी विचारही केला नसल्याचे रिची यांनी म्हटले आहे.

48 व्या इंटरनॅशनल एमी अवॉर्ड्समध्ये नेटफ्लिक्सची वेब सीरिज दिल्ली क्राइमची बेस्ट ड्रामा सीरिज म्हणून निवड झाली आहे. विशेष म्हणजे हा पुरस्कार आपल्या नावी करणारी ही पहिली भारतीय वेब सीरिज ठरली आहे. या वेब सीरिजचे दिग्दर्शन रिची मेहता यांनी केले होते. देशासाठी पहिला एमी पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला आहे. रिची यांच्या म्हणण्यानुसार, या सीरिजला एमी हा पुरस्कार मिळेल, असा कधी विचारही केला नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.

निर्भया केसवर इंस्पायर्ड होती सीरिज
रिची यांन दिव्य मराठीकडे आपला आनंद व्यक्त करताना म्हटले की, हा विजय यामागे अनेक वर्षे कष्ट घेत असलेल्या शेकडो लोकांच्या मेहनतीला सलाम आहे. दिल्ली क्राइम ही निर्भया बलात्कार प्रकरणावर आधारित एक काल्पनिक कथा आहे. ही राग, निराशा, प्रेम आणि दु:खाने भरलेली एक वेब सीरिज आहे. मी या मालिकेशी संबंधित असलेल्या प्रत्येक व्यक्तीचे आणि त्यामागील व्हिजनचा आभारी आहे.

दिल्ली क्राइमचे दिग्दर्शख रिची मेहताचे कोण आहेत
रिची भारतीय वंशाचे कॅनेडियन चित्रपट निर्माता आहेच. त्यांच्यासाठी हा विजय यासाठी देखील महत्त्वाचा आहे कारण याद्वारे त्यांनी डिजिटल व्यासपीठावर पदार्पण केले आहे. रिची यांचा पहिला चित्रपट 2008 मध्ये प्रदर्शित झालेला अमल आहे. यानंतर रिची यांनी आय विल फॉलो यू डाउन, सिद्धार्थ आणि इंडिया इन अ डे हे चित्रपटही बनवले. दिल्ली क्राइम मार्च 2019मध्ये नेटफ्लिक्सवर रिलीज झाली होती.

आकाशने स्वत: प्रोटेस्टमध्ये भाग घेतला होता
कास्टिंग डायरेक्टर आकाश दहिया म्हणाले - दिल्ली क्राईमला हा पुरस्कार मिळाला कारण त्याची ट्रिटमेंट अतिशय रॉ आणि रिअल होती. आम्ही त्याला लाउड किंवा फिल्मी होऊ दिले नाही. कॅमेरा वर्क रिअल होते. प्रत्येक दृश्यात कॅमेरा सोबत चालत होता. संपूर्ण चित्रीकरणात कॅमेरा हँडी होता. यासाठी ट्रायपॉडचा वापर झाला नाही. दिल्ली पोलिसांनी निर्भया केसमध्ये खोलवर संशोधन केले होते. दिग्दर्शक रिची यांनी 4-5 वर्षे संशोधन केले. निर्भया घटनेदरम्यान मी आणि रिची सर्व दिल्लीमध्ये होते. त्या दिवसांत मी निषेध करण्यासाठी इंडिया गेटवरही जात असे. त्यानंतर रिची यांनी शंभर टक्के सर्व पक्षांची बाजू समजून घेतली होती.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser