आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सुशांत प्रकरणात ईडीची चौकशी:दिग्दर्शक रूमी जाफरी चौकशीसाठी ईडी कार्यालयात पोहोचले; सुशांतसोबत बनवणार होते चित्रपट, दिली होती 15 कोटींची ऑफर

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
सकाळी साडे अकराच्या सुमारास रुमी जाफरी ईडी कार्यालयात पोहोचले.
  • ईडीच्या चौकशीत रुमी जाफरी यांचा जबाब अत्यंत महत्त्वाचा समजला जातोय.

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणी मनी लाँडरिंगच्या अँगलने चौकशी करत असलेल्या अंमलबजावणी संचालनालय (ईडी) ने लेखक आणि दिग्दर्शक रुमी जाफरी यांना चौकशीसाठी बोलावले आहे. सकाळी 11.30 वाजता ते ईडी कार्यालयात पोहोचले आहेत.

ईडीपूर्वी मुंबई पोलिसांनी रुमी जाफरी यांची चौकशी केली होती. पोलिसांना दिलेल्या जबाबात रुमी यांनी सांगितले होते की, ते सुशांतसोबत एक चित्रपट करणार होते आणि या चित्रपटासाठी त्याला 15 कोटींची ऑफर देण्यात आली होती. लॉकडाऊननंतर चित्रपटावर काम सुरू होणार होते.

  • सुशांतने रुमी यांना त्याच्या डिप्रेशनविषयी सांगितले होते

रुमी यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की, सुशांतच्या मृत्यूच्या दोन दिवसांपूर्वी म्हणजे 12 जून रोजी फोनवर त्यांचे त्याच्याशी बोलणे झाले होते. त्यावेळी सुशांतने त्यांना त्याच्या डिप्रेशनविषयी सांगितले होते आणि सोबतच ही इंडस्ट्री सोडायची इच्छादेखील त्यांच्याकडे व्यक्त केली होती.

  • मे महिन्यात सुरु होणार होते चित्रीकरण

रुमी जाफरी सुशांतसोबत जो चित्रपट बनवणार होते, त्याचे शीर्षक अद्याप ठरलेले नव्हते. मात्र चित्रपटाचे काम सुरु करण्यासाठी ते लॉकडाऊन संपण्याची वाट पाहात होते. या चित्रपटाचे शूटिंग मे महिन्यात होणार होते. परंतु याचकाळात लॉकडाऊन होते त्यामुळे चित्रीकरण पुढे ढकलण्यात आले होते. सुरुवातीला या चित्रपटाची गाणी शूट केली जाणार होती. तशी कल्पना त्यांनी सुशांतला दिली होती. सुशांतचे पात्र लक्षात ठेऊनच चित्रपटाची कथा लिहिण्यात आली होती. याच चित्रपटात जाफरी यांनी सुशांतसोबत रिया चक्रवर्ती हिलादेखील कास्ट केले होते, अशी माहिती मिळते. या चित्रपटासाठी सुशांतला 15 कोटींची ऑफर देण्यात आली होती.

ईडीच्या चौकशीत रुमी जाफरी यांचा जबाब अत्यंत महत्त्वाचा समजला जातोय. सुशांतला 15 कोटी रुपये दिले गेले होते की नाही याची चौकशी ईडी करणार आहे. रुमी यांना इतर अनेक प्रश्न विचारले जाऊ शकतात.

ईडीने 12 लोकांची चौकशी केली आहे

  • ईडी 7 ऑगस्टपासून सुशांत प्रकरणावर चौकशी करत आहे. आतापर्यंत ईडीकडून रिया चक्रवर्ती, तिचे वडील इंद्रजित चक्रवर्ती, तिचा भाऊ शोविक चक्रवर्ती, रूममेट सिद्धार्थ पिठानी, सुशांतची माजी मॅनेजर श्रुती मोदी, हाऊस मॅनेजर सॅम्युएल मिरांडा यांचा जबाब नोंदवला आहे.
  • सुशांतच्या घरी काम करणा-या काही लोकांचीही चौकशी झाली आहे. याशिवाय सुशांतची मोठी बहीण मितू सिंहचाही जबाब नोंदवण्यात आला आहे.