आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

चर्चा:दिग्दर्शक रुमी जाफरी म्हणाले, 'सुशांतला यापुढे चित्रपटात काम करायचे नव्हते, वारंवार विचारुनही त्याने कारण सांगितले नव्हते'

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सुशांत गेल्या सहा महिन्यांपासून नैराश्यातून जात होता.
Advertisement
Advertisement

लॉकडाऊननंतर सुशांत सिंह राजपूत गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती सोबत एक चित्रपट करणार होता. दिग्दर्शक रुमी जाफरी हा चित्रपट दिग्दर्शित करणार होते. चित्रपटाची स्क्रिप्ट लॉक झाली होती. त्याचे शूटिंग मेमध्ये सुरू होणार होते आणि नोव्हेंबरमध्ये संपणार होते, परंतु लॉकडाऊनमुळे ते होऊ शकले नाही आणि या दरम्यान सुशांतचे निधन झाले. दिग्दर्शक रूमी जाफरी यांनी एबीपी न्यूज वेबसाइटसोबत सुशांतविषयी बातचीत केली.
 
सुशांतला अभिनय सोडायचा होता

रुमी यांनी मुलाखतीत सांगितले की, 'लॉकडाऊन संपल्यानंतर सुशांतने मला आणखी एका छोट्या बजेट चित्रपटावर काम करण्यास सांगितले होते. लॉकडाऊनच्या मार्गदर्शक तत्त्वांचे अनुसरण करून आपण 20-25 क्रू मेंबर्ससमवेत एक चित्रपट बनवावा, असे तो मला म्हणाला होता. मी सुशांतच्या सल्ल्यानुसार स्क्रिप्टवर काम करत होतो, असे रुमी यांनी सांगितले.

रुमी पुढे म्हणाले, 'सुशांत गेल्या सहा महिन्यांपासून नैराश्यातून जात होता. एकदा त्याने मला सांगितले होते की त्याला आता यापुढे चित्रपटांमध्ये अधिक काम करायचे नाही. त्याला अभिनय सोडायचा आहे. जेव्हा तो असे म्हणाला तेव्हा मी अनेकदा त्याला यामागचे कारण विचारले पण तो काहीही बोलला नाही.'  मला शेती करायची आहे असे तो नेहमी मला सांगत असे. त्याला देशभरात एक लाखांहून अधिक झाडे लावायची होती. त्याला नेहमीच सायंटिस्टप्रमाणे नवीन नवीन गोष्टींचा शोध लावायचा होता, असेही रुमी यांनी सांगितले. 

8 जून रोजी सुशांतची माजी मॅनेजर दिशा सालियनच्या आत्महत्येचे वृत्त समजल्यानंतर सुशांतला फोन केल्याचेही रुमी यांनी सांगितले. 'मी सुशांतला स्वत: ची काळजी घेण्यास सांगितले, ज्यावर त्याने मला एक व्हॉईस नोट पाठविली आणि सांगितले की तो स्वतःची काळजी घेईल. पण तो एवढा टोकाचे पाऊल उचलून आपल्याला कायमचा सोडून जाईल याची मला कल्पना नव्हती', असे ते म्हणाले. 

14 जून रोजी मृत्यू : सुशांतने 14 जून रोजी सकाळी मुंबईच्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. 34 वर्षीय सुशांत काही काळापासून मानसिक तणावात होता. 15 जून रोजी त्याच्यावर मुंबईत अंत्यसंस्कार करण्यात आले. नेटफ्लिक्सवर रिलीज झालेल्या 'ड्राईव्ह' या चित्रपटात सुशांतला अखेरचा दिसला.  

Advertisement
0