आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
दिग्दर्शक संजय पूरन सिंह चौहान 'चंदा मामा दूर के' हा चित्रपट बनवून दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतला श्रद्धांजली देणार आहेत. नुकत्याच एका मुलाखती दरम्यान संजय यांनी याची घोषणा केली आहे. हा चित्रपट सुशांतचा ड्रीम प्रोजेक्ट होता. चित्रपटसृष्टीतील सुशांतचा सर्वात जवळचा मित्र संजयला त्याच्याबरोबर भारताचा पहिला स्पेस चित्रपट बनवायचा होता. चित्रपटाच्या पात्राची तयारी करण्यासाठी 2018 मध्ये सुशांत नासालाही गेला होता. पण बजेटमुळे हा चित्रपट रखडतच राहिला. सुशांतच्या मृत्यूनंतर संजयने या चित्रपटावर काम करणे बंद केले होते. आता संजय या चित्रपटासाठी सुशांतची रिप्लेसमेंट शोधत आहेत.
सुशांतच्या जागी दुसर्याला कास्ट करणे कठीण
या मुलाखतीदरम्यान संजय पूरण सिंह म्हणाले की, या चित्रपटाच्या मुख्य भूमिकेसाठी सुशांतची रिप्लेसमेंट शोधणे अतिशय कठीण काम आहे. या चित्रपटाची स्क्रिप्ट अजून पूर्ण झालेली नाही. तसेच नव्या लीड कलाकारांचा शोधही सुरू आहे.
सुशांत माझ्या अगदी जवळ होता
याआधी सुशांतसोबतच्या नात्याविषयी संजयने एका मुलाखती दरम्यान सांगितले होते. ते म्हणाले होते की, चित्रपटाच्या निर्मात्यांशी झालेल्या वादामुळे सुशांत आणि माझ्यातील संबंध कधीच बिघडले नाहीत. तो माझ्या अगदी जवळचा होता. आमच्यात कायम बोलणे व्हायचे. चित्रपटांबद्दल पुस्तकांबद्दल नेहमीच आमच्यात चर्चा व्हायची.
सुशांत प्रकरणात सीबीआयची चौकशी सुरू आहे
सुशांत सिंह राजपूत 14 जून 2020 रोजी मुंबईच्या वांद्रे येथील फ्लॅटमध्ये मृतावस्थेत आढळून आला होता. त्याेच्या निधनानंतर सीबीआय, ईडी, एनसीबी, मुंबई पोलिस आणि बिहार पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला, पण अभिनेत्याच्या मृत्यूमागील खरे कारण अद्याप समोर आलेले नाही. या प्रकरणाची सीबीआय चौकशी सुरू आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.