आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इंटरव्ह्यू:दिग्दर्शक सतीश कौशिक यांच्या डोक्यात ‘तेरे नाम 2’साठी 3-4 कथानकांच्या कल्पना; चित्रपटासाठी सलमानही उत्सुक, मात्र कोरोनामुळे होतोय उशीर

अमित कर्ण9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सलमानला नक्कीच ही भूमिका पुन्हा करायला आवडेल.

चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक सतीश कौशिक यांनी मंगळवारी आपला 64 वा वाढदिवस साजरा केला. विशेष म्हणजे त्यांनी नुकतीच कोरोनावर यशस्वी मात देखील केली आहे. इतकेच नाही तर त्यांची मुलगी वंशिका हिलादेखील कोरोनाची लागण झाली होती. ती देखील आता बरी झाली आहे. या निमित्ताने त्यांचा आगामी चित्रपट आणि वैयक्तिक जीवनाबाबत ‘दिव्य मराठी’ने मारलेल्या गप्पा...

  • कोरोनातून ठीक झाल्यानंतर घरातले वातावरण कसे आहे?

माझ्यापेक्षा माझी मुलगी वंशिका आणि घरात काम करणाऱ्या तिघांना याचे जास्त दुःख होते. घरातील तीन नोकरांनाही क्वारंटाइन सेंटरमध्ये पाठवले होते. आता सर्वजण निगेटिव्ह होऊन आले आहेत. मात्र, वंशिकाला कोविड होणे काळजाचा ठोका चुकवणारे होते. उपचारावेळेस तिला जास्त इंजेक्शन आणि औषधे द्यावी लागली. हे मोठे वेदनादायी होते. चित्रपट उद्योगही संकटात आहे. चित्रपटगृहांची जितकी कमाई होणार होती, ती सध्या थांबली आहे. मात्र, आम्ही चित्रपट उद्योगातली माणसं स्वप्नं पाहणारी असतो. आम्ही हेच स्वप्न पाहत आहोत, की सारे काही ठीक होईल.

  • सध्या तुमचे इतर कोणकोणते प्रोजेक्ट सुरू आहेत?

हे पाहा लिहिण्याचे कामकधी थांबत नाही. एका वेब शोचे लिखाण सुरू आहे. अनुपम खेरसोबत मी एका चित्रपटाचे चित्रीकरणही पूर्ण केले आहे. त्याचे नाव ‘नौटंकी’ आहे. आम्ही सगळे या चित्रपटाचे निर्माते आहोत. ही दोन जास्त वयाच्या मित्रांची गोष्ट आहे. याशिवाय प्राइम व्हिडिओ, नेटफ्लिक्ससाठी प्रोजेक्ट तयार केले आहे. दोन फिचर फिल्मचे काम सुरू आहे.

  • सलमानसोबत ‘तेरे नाम 2’ केव्हा सुरू करणार आहात?

सध्या चित्रपट होणे कठीण आहे. ‘कागज’च्या प्रदर्शनानंतर कोविडमुळे सलमानची भेट झाली नाही. इतकेच काय आम्ही ‘कागज’च्या यशाची पार्टीही करू शकलो नाही. माझ्याजवळ ‘तेरे नाम 2’साठी 3-4 कल्पना आहेत. मात्र, कुठली पटकथा निश्चित नाही. अजून सलमाननेही या कल्पनांना होकार दिला नाही.

  • सलमानशिवाय हा चित्रपट इतर कुणासोबत होऊ शकतो की नाही?

अलबत होऊ शकतो. पण, हे केव्हा होईल जेव्हा ‘तेरे नाम’च्या राधे ऐवजी आम्ही कोणती दुसरी कहाणी विकसित करू. त्याचा आम्ही अजून विचार केला नाही. ‘तेरे नाम’च्या वेळी सलमान स्वतः राधेबद्दल खूप उत्सुक होता. भूमिका निर्मितीमध्ये त्याचे योगदान महत्त्वाचे होते. राधेच्या भूमिकेची केशरचनेची कल्पना त्याचीच होती. त्याला नक्कीच ही भूमिका पुन्हा करायला आवडेल.

बातम्या आणखी आहेत...