आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डायरेक्टर्स कट:दिग्दर्शक शुजित सरकार म्हणाले - 'सरदार उधम’च्या माध्यमातून शहीद भगतसिंग आणि जालियानवाला बाग, दोन्हींचा उल्लेख झाला

आकाश खरे12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • ‘सरदार उधम’मध्ये विकी कौशल मुख्य भूमिकेत झळकला.

‘सरदार उधम’ या विकी कौशलच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या चित्रपटाने चांगले कौतुक मिळवले. यानिमित्त ‘दिव्य मराठी’ने चित्रपटाचे दिग्दर्शक शुजित सरकार यांच्याशी या चित्रपटाचे कारण आणि काही महत्त्वाच्या बाबींविषयी जाणून घेतले...

‘सरदार उधम’ चित्रपटाचा विचार कसा आला?
आधी मी शहीद भगत सिंग यांच्यावर चित्रपट बनवण्याचा विचार करत होतो. त्यासाठी मी जालियनवाला बाग पाहून आलो हाेतो. त्याच वेळी मी उधम सिंग यांच्याविषयी ऐकले. तेव्हा मी संशोधन केले माहिती गोळा केली. त्यांनतर त्यांच्यावरच चित्रपट बनवण्याचा विचार केला. या चित्रपटात भगत सिंग आणि जलियानवाला बाग दोन्हीचाही उल्लेख होईल, असा विचार आला.

या चित्रपटात भगतसिंगांना वेगळ्या दृष्टिकोनातून दाखवण्याचे कारण?
आपण त्यांना जसे पाहत आलाे आहाेत, तसेच मी सादर करण्याचा प्रयत्न केला आहे. हा चित्रपट त्यांच्यावर आधारित असता तरी ताे असाच असता. चित्रपटात भगतसिंगाची फक्त 4 ते 5 दृश्ये आहेत, पण त्यातच त्यांचे व्यक्तिमत्त्व स्पष्टपणे दिसून येते, ते कोणत्या प्रकारचे होते आणि ते आपल्याला तसेच हवे आहेत.

जालियानवाला बागचे दृश्य करताना मनात काय विचार सुरु होता?
चित्रपटातील हे दृश्य सर्वात कठिण हाेते. इतक्या सर्व लोकांसोबत शूटिंग कसे करावे, हा प्रश्न पडला होता. आम्ही त्या हत्येत मारल्या गेलेल्या लोकांच्या नातेवाईकांना भेटलो त्यांच्या भावना जाणून
घेतल्या. त्यातून ते भावनिक दृश्य तयार होऊ शकले. त्यानंतर जलियानावाला बागेसारखीच जागा शोधणे हे आमच्यासाठी मोठे टास्क होते. खूप शोध घेतल्यानंतर आम्हाला तशी जागा मिळाली आणि
आम्ही 19 ते 20 दिवसांत ते दृश्य चित्रीत केले. दुसरीकडे विकीला 20 वर्षांचे दाखवायचे होते, तेदेखील आमच्यासमोर मोठे आव्हान होते. इतक्या सर्व टेंशनमध्ये चित्रीकरण खूपच अवघड होते. मात्र ते
दृश्य खूपच चांगले झाले, शूटिंग झाल्यानंतर मी आणि माझ्या टीमचे बरेच लोक रडलो.

इरफान खानला ही कथा ऐकवल्याचे ऐकले? त्यांची आठवण आली का ? त्यांच्यासाेबत इतकी चर्चा झाली नव्हती. आम्ही त्यांना याचा फक्त आयडिया सांगितली होती. त्यानंतर आम्ही जेव्हा विकीसोबत या चित्रपटावर चर्चा केली, त्यानंतर आमच्या डोक्यात फक्त विकीच होता. आम्ही त्याच्याशी चर्चा केली, त्यानेही यासाठी खूप अभ्यास केला, लोकांशी बोलला, बऱ्याच ठिकाणी पाहून आला आणि त्याने उधमसिंगांची उत्तम व्यक्तीरेखा साकारली.

विकीला या भूमिकेसाठी कास्ट करण्यामागचे कारण काय?
सर्वात मोठे कारण म्हणजे आम्हाला आमचे मुख्य पात्र 20 वर्षांचे दाखवायचे होते. जेव्हा आम्ही विकीला पाहिले तेव्हा आम्हाला तो परिपूर्ण असल्याचे आढळले. दुसरे, आम्हाला आमच्या कथेत थोडा पंजाबी बाणा हवा होता. त्याला कास्ट करण्याआधी आम्ही फक्त त्याचे काम “मसान” मध्ये पाहिले होते. त्यामुळे त्याची निवड केली.

बातम्या आणखी आहेत...