आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वादात अडकले ‘वॉर’चे दिग्दर्शक:सिद्धार्थ आनंदने मानसिक रूग्ण महिलेच्या मुलाला घेतले होते दत्तक, आता आई झाली बरी, पण मूल परत देण्यास सिद्धार्थचा नकार

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • मुलाला अनाथाश्रमात पाठवले गेले, पण नंतर तो पुन्हा सिद्धार्थ यांच्याकडे परतला

'सलाम नमस्ते', 'अनजाना अनजानी' आणि 'वॉर' या चित्रपटाचे दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद आणि त्यांच्या पत्नीने गेल्या वर्षी एका मुलाला दत्तक घेतले होते, ज्यामुळे ते आता वादात सापडले आहेत. झाले असे की, ज्या संस्थेकडून सिद्धार्थ यांनी मुलाला दत्तक घेतले आहे, त्या संस्थेने आता त्यांना मुलाला त्याच्या बायोलॉजिकल आईला परत करण्यास सांगितले आहे. पण आनंद कुटुंब मुलाशी इतके भावनिकरीत्या जुळले आहेत की ते मुलाला परत करु इच्छित नाहीत.

ही कहाणी गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये सुरू झाली होती

बॉलिवूड हंगामाच्या वृत्तानुसार, गेल्या वर्षी 17 सप्टेंबर रोजी बोरिवली रेल्वे स्टेशन पोलिसांना एक मानसिक रुग्ण असलेली 30 वर्षीय महिला आढळली होती. ही महिला बोरिवली स्टेशनवर मुलाला दूध पाजत होती. नीट लक्ष दिल्यानंतर पोलिसांना मुलाच्या हातावर आणि शरीराच्या इतर भागावर चावा घेतल्याच्या खुणा दिसल्या होत्या.

याव्यतिरिक्त, मुलाला मारहाण केल्याच्याही खुणा पोलिसांना दिसल्या होत्या. वेळ न गमावता पोलिसांनी मुलाला मुंबईच्या बाल कल्याण समितीकडे (सीडब्ल्यूसी) सुपूर्द केले. आणि दुसरीकडे महिलेला कर्जत येथील श्रद्धा पुनर्वसन फाउंडेशनमध्ये उपचारासाठी पाठवण्यात आले.

सिद्धार्थ आनंद मुलापर्यंत कसे पोहोचले?

सीडब्ल्यूसीने मुलाला दत्तक देण्यासाठी कौटुंबिक सेवा (एफएससी) केंद्राची मदत घेतली. अशा प्रकारे, सिद्धार्थ आणि त्यांच्या कुटुंबीयांनी मुलाला दत्तक घेतले आणि लवकरच ते त्याच्याशी भावनिकरीत्या जुळले.

महिला बरी झाल्यानंतर तिने मुलाला परत मागितले

दरम्यान, एफएससीने श्रद्धा पुनर्वसन फाउंडेशनला मुलाच्या आईच्या स्थितीबद्दल विचारले. ही महिला शारीरिक व मानसिकरीत्या बरी होत असल्याचे त्यांना समजले. तिच्या रिपोर्टच्या आधाराावर पुनर्वसन फाउंडेशनच्या अधिकार्‍यांनी एफएससीला मानसोपचारतज्ज्ञ फिटनेस प्रमाणपत्र आणि वैद्यकीय योग्यता प्रमाणपत्र दिले.

रिहॅबिलिटेशन अथॉरिटीजनेही सांगितले की, त्या महिलेची आपल्या मुलासाठी तळमळ सुरु झाली आहे. त्यामुळे एफएससीने तिच्या बाळाला तिला परत करावे. सीडब्ल्यूसीने महिला आणि मुलाची डीएनए चाचणी करण्यास सांगितले. जे. जे. रूग्णालयात त्यांची डीएनए चाचणी झाली असून तीच महिला त्या मुलाची आई असल्याचे स्पष्ट झाले आहे.

मुलाला अनाथाश्रमात पाठवले गेले, पण नंतर तो पुन्हा सिद्धार्थ यांच्याकडे परतला
1 डिसेंबर रोजी सीडब्ल्यूसीच्या सुनावणीत सिद्धार्थ आनंद त्यांच्या वकिलांसह स्थानिक राजकारणी आणि पत्रकारासोबत हजर होते. त्यांनाला सांगण्यात आले की, बाळाची आई पूर्णपणे बरी झाली आहे, त्यामुळे तिला मुल परत घेण्याचा हक्क आहे.

सीडब्ल्यूसीने पोलिसांना मुलाला सिद्धार्थ आनंद आणि त्याच्या कुटुंबापासून वेगळे करून सरकारी अनाथाश्रम (आशा सदन) च्या स्वाधीन करण्याचे आदेश दिले. मात्र त्याच रात्री पोलिसांनी आशा सदन गाठून मुलाला परत घेऊन सिद्धार्थच्या कुटुंबियांच्या स्वाधीन केले.

आई अजूनही आपल्या मुलाला भेटायची वाट पहात आहे
सध्या ते मूल सिद्धार्थ आनंद आणि त्याच्या कुटुंबासमवेत आहे. ते त्याच्याशी भावनिकरीत्या जोडलेले आहेत आणि त्याला आपल्या जवळ ठेवण्यासाठी कायदेशीर लढाई लढण्यास देखील तयार आहेत.
दुसरीकडे, श्रद्धा पुनर्वसन फाउंडेशनचे अधिका-यांना आशा आहे की, मुलाला त्याच्या आईकडे सोपवले जाईल. ही महिला दररोज आपल्या मुलाबद्दलच विचारणा करत असते. मात्र, वारंवार कॉल व मेसेज करुनही सिद्धार्थ यांच्या कुटूंबाकडून कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही. सिद्धार्थ यांचे ममता भाटियाशी लग्न झाले असून त्यांना रणवीर हा एक मुलगा आहे.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser