आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खास बातचीत:'द फॅमिली मॅन 2'वरील वादावार दिग्दर्शिक सुपर्ण एस वर्मांनी दिले स्पष्टीकरण, पीएम बासू यांच्या पात्रासाठी देशातील महिला राजकारण्यांकडून घेतली प्रेरणा

अमित कर्ण13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • दिग्दर्शक सुपर्ण एस वर्मांनी सर्व आरोप खोटे ठरवले आहेत.

मनोज बाजपेयीची महत्त्वाची भूमिका असलेला 'द फॅमिली मॅन 2' या वेब शोची सध्या सर्वत्र चर्चा आहे. आहे. एकीकडे अनेक देश याची प्रशंसा करत आहेत, तर दुसरीकडे हा वादाचा विषय बनला आहे. या शोवर असा आरोप आहे की, यात पीएम बासू यांचे पात्र मुद्दाम सत्ताधारी पक्षाला खिजवण्यासाठी देण्यात आले असून ते त्यात विशेष बनवण्यात आले आहे. तसेच त्यांच्या सल्लागाराचे नावही असेच ठेवण्यात आले आहे. त्यातच लिट्चे पात्रही रुजवण्यात आले आहे. दैनिक दिव्य मराठीसोबत झालेल्या या विशेष चर्चेत दिग्दर्शक सुपर्ण एस वर्मांनी हे आरोप खोटे ठरवले आहेत.

अनेक राजकारण्यांकडून घेतली प्रेरणा
सुपर्णने सांगितले, सीमा विश्वास यांनी साकारलेल्या पंतप्रधान बासू यांच्या पात्रासाठी अनेक राजकारण्यांकडून प्रेरणा घेतली आहे. विशेष म्हणजे वेशभूषेसाठी आम्ही सुषमा स्वराज, ममता बॅनर्जी आणि स्मृती ईराणी यांच्याकडून प्रेरणा घेतली आहे. आपल्या अनेक महिला राजकारणी आहेत, ज्यासाठी आम्ही यातील अनेक पात्रांचे थोडे थोडे चवीसारखे मिश्रण टाकले आहे.

9 एपिसोडमधील 3 असे सीन, जे सिंगल टेकमध्ये झाले चित्रीत
सुपर्ण सांगतात की, यात अशी तीन दृष्ये आहेत, जे एकाच टेकमध्ये चित्रीत झाले आहेत. एक सुरुवातीचा सिक्वेन्स, दुसरा जेव्हा पोलिस स्टेशनवर समोरच्या ग्रुपचा हल्ला आणि तिसरा क्लायमॅक्समधील स्फोट असणारा धमाक्याचे दृश्य. क्लायमेक्स सीनसाठी विधीवर वीएफएक्स स्टोरीचा बोर्ड बनवण्यात आला होता. निम्म्या दृश्यात मुळ प्लेन आणि बाकी भागासाठी वीएफएक्सवरुन प्लेन बनवण्यात आले होते. हे सर्व एकाचवेळी झाले.

'राजी'च्या पात्रासाठी सामंथाने घेतली दीड महिना कॉम्बॅट ट्रेनिंग
शोमध्ये तमिल रेबेल राजीच्या पात्रासाठी सामंथा अक्किनेनीने खूप प्रयत्न केले आहेत. निर्मात्यांनी आधी तिला एका पात्राचे स्केच पाठवले होते, ज्यासोबत त्या पात्राचा थोडा संदर्भही होता. जो पाहून सामंथाने लगेचच होकार दर्शवला. ज्यातील सर्व अॅक्शन सीन तिने स्वतः केलेले आहेत. कुठेच बॉडी डबलचा वापर करण्यात आलेला नाही. यासाठी तिने दीड महिना कॉम्बॅट ट्रेनिंग घेतली आहे.

सीनदरम्यान रडू लागली होती सामंथा
याशिवाय राजीच्या पात्राच्या अंतरंगात जाण्यासाठी सामंथाने तमिळ रेबेलवर बनवलेल्या अनेक डॉक्युमेंट्रीज पाहिल्या. तिला तमिळ रेबेल यांचे दुःख माहित होते. त्यामुळेच त्या त्या पात्रात तोच सुन्नपणा ती आणू शकली. चित्रीकरणादरम्यान ती देखील एका जागी येत पूर्णतः कोलमडली. एका दृष्यावेळी तिला रडू कोसळले होते.

बातम्या आणखी आहेत...