आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निधन:'सौदागर', 'डिस्को डान्सर'चे कलादिग्दर्शक मारुती काळे काळाच्या पडद्याआड, कोरोनामुळे मालवली प्राणज्योत

19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मारुती काळे यांनी 100 हून अधिक चित्रपटांसाठी कलादिग्दर्शक म्हणून काम केले होते.

'सौदागर', 'डिस्को डान्सर' सारख्या गाजलेल्या चित्रपटांसाठी कलादिग्दर्शन करणारे मारुती काळे यांचे 26 मे रोजी कोरोनामुळे निधन झाले. ते 92 वर्षांचे होते. काळे यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे त्यांच्यावर मुंबईतील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते.

एका वृत्तवाहिनीशी बोलताना मारुती काळे यांची मुलगी कल्पना यांनी सांगितले की, 7 मे रोजी त्यांच्या वडिलांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्यांना होली फॅमिली हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

मारुती काळे यांनी 1945 मध्ये चित्रपटांसाठी कलादिग्दर्शक म्हणून काम करायला सुरुवात केली होती. त्यांनी 100हून अधिक चित्रपटांसाठी कलादिग्दर्शन केले होते. कला दिग्दर्शनात येण्यापूर्वी काळे सुतार म्हणून काम करायचे. त्यानंतर त्यांना लंडन फिल्म प्रॉडक्शन लिमिटेडने सहाय्यक कला दिग्दर्शक म्हणून निवडले आणि नंतर स्वतंत्र कला दिग्दर्शक म्हणूनही काम केले.

त्यांनी 'दीवार', 'रोटी कपडा और मकान', 'कभी कभी', 'दो अंजाने', 'रजिया सुल्तान', 'पाकिजा, 'शोर', 'पूरब और पश्चिम', 'मेरा साया', 'यादगार', या चित्रपटांसाठी कलादिग्दर्शन केले होते.

बातम्या आणखी आहेत...