आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिशा पाटणीचा 'ऊ अंटावा'वर जबरदस्त डान्स:पुरुष हॉकी वर्ल्ड कप 2023 मध्ये केले होते परफॉर्म

8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड अभिनेत्री दिशा पाटणीचा एक डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये दिशा पुष्पाच्‍या 'ऊ अंटावा' गाण्‍यावर जबरदस्त डान्‍स करताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये दिशा ब्लॅक ड्रेसमध्ये खूपच ग्लॅमरस दिसत आहे. हा व्हिडिओ पुरुष हॉकी विश्वचषक 2023 उद्घाटन समारंभचा आहे. दिशाच्या या व्हिडीओवर सोशल मीडिया यूजर्स जोरदार कमेंट करत आहेत. एका यूजरने 'तू जगातील सर्वात सुंदर मुलगी आहेस' अशी कमेंट केली आहे. तर दुसऱ्याने लिहिले, 'हा डान्स सामंथापेक्षा चांगला नाही'.

‘ऊ अंटावा’ गाण्याला दिशाने रिजेक्ट केले होते

अल्लू अर्जुन स्टारर 'पुष्पा' चित्रपटातील प्रत्येक डायलॉग आणि सीन प्रसिद्ध असला तरी, समंथा रुथ प्रभूच्या 'ऊ अंटावा' या गाण्याचा वेगळा चाहता वर्ग आहे. मात्र चित्रपटातील 'ऊ अंटावा' या गाण्यासाठी पहिली पसंती दिशा पाटणी होती, मात्र तिने नकार दिल्यानंतर हे गाणे समंथाला मिळाले. वृत्तांवर विश्वास ठेवला तर, तिने तिचा माजी प्रियकर टायगर श्रॉफच्या सांगण्यावरून हे गाणे नाकारले होते.

दिशा पाटणीचे वर्कफ्रंट
वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर दिशा पाटणी 2022 मध्ये 'एक व्हिलन रिटर्न्स'मध्ये दिसली होती. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच फ्लॉप झाला. आता लवकरच दिशा सिद्धार्थ मल्होत्रासोबत करण जोहरची निर्मिती असलेल्या 'योद्धा' या चित्रपटात दिसणार आहे. याशिवाय ती 'प्रोजेक्ट के' आणि 'शिवा'मध्ये दिसणार आहे.

बातम्या आणखी आहेत...