आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिशा पाटनीला झाला होता मेमरी लॉसचा आजार:डोक्याला दुखापत झाल्यामुळे गेली होती स्मरणशक्ती

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अभिनेत्री दिशा पाटनीने अलीकडेच खुलासा केला आहे की, प्रशिक्षणादरम्यान एकदा काँक्रीटच्या छतावरून पडल्यामुळे तिच्या डोक्याला दुखापत झाली होती. त्यामुळे जवळपास सहा महिने तिची स्मरणशक्ती गेली होती. दिशा सांगते की, 'भारत' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान ती जिम्नॅस्ट खेळण्याच्या सीक्वेन्सचे शूटिंग करत असताना ही घटना घडली. फ्लिप मारताना डोक्यावर पडून तिला दुखापत झाली होती.

दिशा फिटनेसबाबत खूप सिरिअस आहे
दिशा पाटनी तिच्या फिटनेसबाबत खूप गंभीर आहे. जिममध्ये तासनतास घाम गाळण्यासोबतच ती जिम्नॅस्टमध्येही हात आजमावत असते. अलीकडेच जिम्नॅस्टच्या सरावादरम्यान बोलताना दिशा म्हणाली- "जेव्हा मी चित्रपटाचे शूटिंग करत नसते तेव्हा मी निश्चितपणे जिम्नॅस्टचा प्रयत्न करते. जिम्नॅस्ट होण्यासाठी तुम्ही नियमित आणि धाडसी असायला हवे. मी जिथे आहे तिथे पोहोचण्यासाठी मला थोडा वेळ लागला आहे. तुम्ही तुमचे हाडे आणि गुढगे फोडून घेतल्यानंतर तिथपर्यंत पोहचू शकता."

एमएस धोनीच्या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण
दिशाच्या अलीकडील प्रोजेक्ट्सबद्दल बोलायचे झाले तर ती लवकरच मोहित सूरीच्या 'एक व्हिलन रिटर्न' या चित्रपटात दिसली. या चित्रपटात ती जॉन अब्राहम आणि अर्जुन कपूरसोबत दिसली होती. एमएस धोनी या चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये करिअरला सुरुवात केली. या चित्रपटातील तिची भूमिका खूपच छोटी होती पण छोट्या पडद्यावरही तिने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना खूप प्रभावित केले होते.

बातम्या आणखी आहेत...