आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विज्ञानावर आधारित सिनेमा:प्रभास-दीपिका पदुकोणच्या ‘प्रोजेक्ट के’ मध्ये झाली दिशा पाटणीची एंट्री

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

दिग्दर्शक नाग अश्विन आपल्या आगामी ‘प्रोजेक्ट के’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. आता या प्रोजेक्टमध्ये दिशा पाटणीची एंट्री झाल्याची बातमी आहे. याची माहिती दिशाने स्वत: आपल्या सोशल मीडियाच्या अकाउंटवर दिली आहे. या चित्रपटात प्रभास, अमिताभ बच्चन, दीपिका पदुकोण आणि दिशा मुख्य भूमिकेत असणार आहेत. मात्र दिग्दर्शकाने अजून चित्रपटाच्या पात्राविषयी कोणतीच माहिती दिली नाही. विशेष म्हणजे या चित्रपटातून दिशा विज्ञानावर आधारित चित्रपटात एंट्री करत आहे.

‘प्रोजेक्ट के’ आतापर्यंतचा सर्वात महागडा भारतीय चित्रपट असल्याचा दावाही केला जात आहे. त्याचे शूटिंग रामोजी फिल्म सिटीमध्ये बांधलेल्या एका विशाल सेटवर केले जाणार आहे. हा एक पॅन इंडिया चित्रपट आहे, तो तेलगू, तामिळ, कन्नड आणि मल्याळम तसेच हिंदीमध्ये प्रदर्शित होणार आहे. दिशाच्या इतर कामाबद्दल बोलायचे झाले तर ती लवकरच ‘एक व्हिलन २’ या चित्रपटात दिसणार आहे. यात तिच्यासोबत अर्जुन कपूर, जॉन अब्राहम आणि तारा सुतारियादेखील आहेत.