आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिशा सॅलियान मर्डर मिस्ट्री:मुलीच्या मृत्यूबद्दल सोशल मीडियावर चुकीच्या गोष्टी पसरवल्याबद्दल दिशाच्या वडिलांनी तिघांविरूद्ध दाखल केली तक्रार

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • मुंबई पोलिसांनी म्हटले आहे की, दिशाच्या मृत्यूची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले होते आणि त्यांनी मृतदेहाचा पंचनामा केला होता.
  • दिशा सॅलियानचा 8 जून रोजी मुंबईतील एका इमारतीच्या 14 व्या मजल्यावरून पडल्याने मृत्यू झाला होता, कुटुंब आणि पोलिस त्यास आत्महत्या मानतात.

अभिनेता सुशांत सिंह राजपूत आणि दिशा सॅलियन यांच्या आत्महत्येच्या घटना आपापसांत जोडून सोशल मीडियावर बर्‍याच गोष्टी प्रसिद्ध केल्या जात आहेत. याला कंटाळून दिशाचे वडील सतीश सॅलियन यांनी मुंबईच्या मालवणी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

सतीश सॅलियान यांनी या प्रकरणी तिघांविरोधात ही तक्रार दाखल केली आहे. त्यात त्यांनी आरोप केला आहे की, दिशाच्या मृत्यूसंदर्भात पुनीत वशिष्ठ, संदीप मलान आणि नमन शर्मा या तिघांनी ब-याच अफवा पसरवल्या आहेत.

  • कुटुंबीयांनी कठोर कारवाईची मागणी केली

दिशाचे वडील या तिन्ही आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करत आहेत. दिशाबद्दल पसरवण्यात आलेल्या निगेटिव्ह गोष्टींमुळे तिचे कुटुंबीय दु: खी झाले आहेत. दिशाने आत्महत्या केल्याच्या तिच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे. मात्र अनेक जण या आत्महत्येबद्दल शंका घेत आहेत.

  • 11 ऑगस्ट रोजी सूरज पांचोलीने अशीच तक्रार दाखल केली होती

यापूर्वी 11 ऑगस्ट रोजी संतप्त झालेल्या अभिनेता सूरज पंचोलीने दिशा सॅलियानच्या मृत्यूप्रकरणी मुंबईच्या वर्सोवा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. 7 पानांच्या तक्रारीत सूरजने आरोप केला आहे की, तो दिशा सॅलियानला ओळखत नव्हता किंवा तो कधी तिला भेटलादेखील नाही. मात्र या प्रकरणी त्याचे नाव जोडून मीडिया आणि सोशल मीडियावर त्याच्याबद्दल खोट्या बातम्या येत आहेत. सूरजने त्याचे मानसिक शोषण करणा-यांवर लवकरात लवकर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

  • मृतदेहावर कपडे नव्हते, या वृत्ताचे पोलिसांकडून खंडन

यापूर्वी बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतची मॅनेजर दिशा सॅलियानच्या मृतदेहावर कपडे नव्हते, अशी चर्चा सुरु झाली होती. मात्र मुंबई पोलिसांनी हे वृत्त फेटाळून लावले. मुंबईचे पोलिस उपायुक्त विशाल ठाकूर म्हणाले की, दिशा सॅलियानच्या अंगावर कपडे नसल्याची बातमी चुकीची आहेत. ते म्हणाले की, घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी मृतदेहाचा पंचनामा केला होता. त्यावेळी दिशाचे पालकही घटनास्थळी हजर होते.

  • 8 जून रोजी दिशाचे निधन झाले

दिशा सॅलियानचा 8 जून रोजी मुंबईच्या मालाड भागातील इमारतीच्या 14 व्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला होता. घटनास्थळी पोलिसांना सुसाइड नोट सापडली नव्हती. पोलिसांनी दिशाने आत्महत्या केल्याचे सांगितले होते. त्याचनंतर आठवड्याभराने 14 जून रोजी सुशांतचा मृत्यू झाला. त्यानंतर लोक या दोन मृत्यूंमध्ये काही तरी कनेक्शन असल्याची शक्यता वर्तवत आहेत.

बातम्या आणखी आहेत...