आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिशा सॅलियन आत्महत्या प्रकरण:पोलिस सूत्रांचा खुलासा - ती व्यावसायिकरित्या खूप तणावात होती, कोरोना रिपोर्टमुळे पोस्टमार्टमध्ये दोन दिवस विलंब झाला होता

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • 8 जून रोजी 14 व्या मजल्यावरून खाली पडल्यामुळे दिशा सॅलियान हिचे निधन झाले होते.
  • पोलिसांनी केलेल्या चौकशीनंतर हे आत्महत्येचे प्रकरण असल्याचे सांगितले गेले होते.

अभिनेता सुशांत सिंह राजपूतची माजी मॅनेजर दिशा सॅलियन हिच्या आत्महत्या प्रकरणात मुंबई पोलिसातील सूत्रांचे म्हणणे आहे की, ती प्रोफेशनली खूप तणावात होती. त्यामुळे तिने हे पाऊल उचलले. सोबतच सूत्रांनी सांगितले की, कोरोना चाचणीच्या अहवालामुळे दिशाच्या पार्थिवाचे शवविच्छेदन व्हायला दोन दिवस उशीर झाला होता.

पोलिस सूत्रानुसार, 'ऑफिसमध्ये दिशाच्या सहका-यांना खूप चांगले क्लायंट मिळत होते, तर तिचा परफॉर्मन्स चांगला नव्हता. ज्यामुळे ती खूप अस्वस्थ झाली होती. त्यामुळे तिचा मूड चांगला व्हावा, या उद्देशाने तिच्या मित्रांनी एक पार्टी ठेवली होती.

  • इमारतीवरुन पडण्यापूर्वी लंडनच्या एका मित्राशी झाले होते बोलणे

सूत्रांनी पुढे सांगितल्यानुसार, दिशा मुंबईच्या मालवणी भागात तिच्या घरी मित्रांसोबत पार्टी करत होती. दरम्यान, 8 जूनच्या रात्री तिला तिच्या एका मित्राचा लंडनहून फोन आला आणि दिशा त्याच्याशी बराच वेळ बोलली. यावेळी ऑफिसच्या कामाबद्दलही त्यांची चर्चा झाली होती आणि थोड्या वेळाने दिशा 14 व्या मजल्यावरून खाली पडली.

  • दिशाचा मृतदेह टॉप व स्कर्टमध्ये मिळाला

सूत्रांच्या माहितीनुसार, पोलिसांना दिशाचा मृतदेह रेड टॉप आणि ग्रे कलरच्या स्कर्टमध्ये सापडला. कोरोनामुळेच दिशाचा स्वॅब घेतला गेला आणि कोविड - 19 ची चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर तिच्या पार्थिवाचे शवविच्छेदन केले गेले. 11 जून रोजी कोरोनाचा अहवाल आला, त्यामुळे शवविच्छेदनासाठी दोन दिवस उशीर झाला होता.

मुंबई पोलिसांचे म्हणणे आहे की, सुशांत आणि दिशाच्या मृत्यूचे प्रकरण हे एकमेकांपेक्षा पूर्णपणे वेगळे आहे आणि या दोन्ही प्रकरणात अद्याप कोणताही संबंध आढळला नाही.

  • पोलिसांनी निवेदन जारी करुन दिले होते स्पष्टीकरण

यापूर्वी काही मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आला होता की, दिशाचा मृतदेह नग्नावस्थेत आढळला आणि सोबतच पोस्टमॉर्टेमसाठी जाणीवपूर्वक उशीर करण्यात आहे. यानंतर रविवारी मुंबई पोलिसांनी एक निवेदन जारी करत म्हटले की, 'दिशा सॅलियनचा मृतदेह नग्नावस्थेत आढळला नसून यासंदर्भातील सर्व बातम्या खोट्या आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलिस तातडीने घटनास्थळी पोहोचले आणि पंचनामा केला होता. त्यावेळी तिचे पालकही घटनास्थळी हजर होते.'

पोलिसांनी सांगितले की, 'दिशा तिची मैत्रिणी अंकिताला अखेरचा फोन केला होता, तिचा जबाबही नोंदवण्यात आला आहे. आतापर्यंत 20-25 लोकांचे जबाब नोंदवले गेले आहेत.

  • शवविच्छदेन अहवालाच्या आधारे चुकीचा दावा करण्यात आला

यापूर्वी शनिवारी दिशाच्या पोस्टमॉर्टम अहवालाच्या आधारे काही माध्यमांच्या वृत्तात असा दावा केला गेला होता की, ज्यावेळी दिशाचा मृत्यू झाला तेव्हा तिच्या शरीरावर कपडे नव्हते. तसेच ऑटोप्सी रिपोर्टमध्ये तिच्या प्रायव्हेट पार्टवर जखमा आढळल्याचेही म्हटले गेले होते. याव्यतिरिक्त पोस्टमार्टम तिच्या मृत्यूनंतर दोन दिवसानंतर करण्यात आल्याचेही सांगण्यात आले.

  • 8 जून रोजी दिशाचे निधन झाले

दिशा सॅलियानचा 8 जून रोजी मुंबईच्या मालाड भागातील इमारतीच्या 14 व्या मजल्यावरून मृत्यू झाला होता. घटनास्थळावरुन पोलिसांना सुसाइड नोट सापडली नाही. पोलिसांनी याला आत्महत्या म्हटले आहे. या घटनेच्या एका आठवड्यानंतर 14 जून रोजी सुशांत सिंह राजपूतनेही आत्महत्या केली. तेव्हापासून लोक या दोन प्रकरणांमध्ये संबंध असल्याची शक्यता व्यक्त करीत आहेत.

  • व्हिडिओ व्हायरल झाला

शनिवारपासून दिशाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये असा दावा केला जात आहे की हा व्हिडिओ दिशाच्या मृत्यूच्या एक तासापूर्वीचा आहे. व्हिडिओमध्ये दिशा तिच्या मित्रांसह डान्स करताना दिसतेय. असा दावा केला जातोय की, दिशाने हा व्हिडिओ 8 जूनच्या रात्री 11:48 वाजता तिच्या मित्रांच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर पोस्ट केला होता. सुमारे एक तासानंतर तिने आत्महत्या केली.

बातम्या आणखी आहेत...