आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा90 च्या दशकात बॉलिवूड अभिनेत्री दिव्या भारतीने आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर गारूड निर्माण केले होते. 25 जानेवारी 1974 ला मुंबईमध्ये दिव्या भारतीचा जन्म झाला होता. दिव्याने करिअरची सुरूवात तेलुगु चित्रपट 'बोबली राजा'द्वारे केली होती. 1992 मध्ये 'विश्वात्मा'द्वारे ती हिंदी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले. या चित्रपटात तिने मुख्य भूमिका साकारली होती. या चित्रपटातील 'सात समुंदर पार मैं तेरे पीछे पीछे आ गई' या गाण्याला पेक्षकांची दाद मिळाली. 1992 ते 1993 या एका वर्षात दिव्या भारतीने 14 बॉलिवूड चित्रपटात काम केले. 'दिवाना या चित्रपटासाठी सर्वोउत्कृष्ट अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कार तिला मिळाला होता. लग्नाच्या एका वर्षानंतर 5 जानेवारी 1993 मध्ये फ्लॅटच्या खिडकीतून पडल्यामुळे दिव्याचा मृत्यू झाला. मात्र तिला मृत्यू अपघात होता की घातपात हे आजही गुलदस्त्यातच आहे.
मृत्यूच्या दिवशीच दिव्याने साइन केली होती नवीन डील
ज्या दिवशी दिव्याचा मृत्यू झाला, त्याच दिवशी तिने तिच्या नवीन अपार्टमेंटची डील साईन केली होती. त्या दिवशी ती चेन्नईहून एका सिनेमाचे शूटिंग पूर्ण करुन मुंबईत परतली होती आणि दुस-या शूटसाठी तिला हैदराबादला रवाना व्हायचे होते. पण नवीन अपार्टमेंटची डील साइन करण्यासाठी तिने शूटिंग लांबणीवर टाकले होते. त्यादिवशी तिच्या पायाला दुखापत झाली होती, त्याची माहिती तिने दिग्दर्शकाला दिली होती.
रजिस्टर्ड फ्लॅटमध्ये राहात नव्हती दिव्या
शूटिंग रद्द केल्यानंतर दिव्याने तिच्या वर्सोवा स्थित फ्लॅटवर ड्रेस डिझायनर फ्रेंड नीता लुल्ला आणि त्यांचे पती डॉ. श्याम लुल्ला यांना भेटण्याचा निर्णय घेतला. फार कमी लोकांना ठाऊक आहे, की दिव्या वर्सोवा येथील ज्या फ्लॅटमध्ये राहात होती, तो फ्लॅट दिव्याच्या नावावर रजिस्टर्ड नव्हता.
मृत्यूच्या काही क्षणांपूर्वी...
नीता आणि त्यांचे पती रात्री दहाच्या सुमारात दिव्याच्या फ्लॅटवर पोहोचले. तिघेही लिव्हिंग रुममध्ये बसले होते. त्यावेळी दिव्याच्या घरी काम करणारी मोलकरीण अमृतासुद्धा घरी होती. बातचित सुरु असताना अमृता किचनमध्ये गेली तर दिव्या खिडकीकडे गेली. त्यावेळी नीता त्यांच्या पतीसोबत लिव्हिंग रुममध्ये एक व्हिडिओ बघत होते.
दिव्याचे शेवटचे क्षण
बिल्डिंगमधील इतर फ्लॅट्सच्या खिडक्यांप्रमाणे दिव्याच्या फ्लॅटच्या खिडकीला ग्रील बसवण्यात आले नव्हते. खिडकीखाली पार्किंग एरिया होता. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे त्यादिवशी पार्किंगमध्ये एकही गाडी उभी नव्हती. काही वेळाने दिव्याने ती खिडकी उघडली आणि त्याच्या कठड्यावर जाऊन बसली. ती तेथून वळली असता, तिचा बॅलेन्स बिघडला आणि खिडकीची फ्रेम पकडताना तिचा तोल जाऊन ती खाली कोसळली. पाचव्या मजल्यावरुन ती थेट खाली क्राँक्रिटच्या फर्शीवर कोसळली.
कूपर हॉस्पिटलमध्ये घेतला अखेरचा श्वास
दिव्या रक्ताच्या थारोळ्यात खाली पडली होती. पण त्यावेळी तिचा श्वास सुरु होता. तिला तातडीने मुंबईतील कूपर हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. पण तिची तब्येत अतिशय खालावत गेली आणि तिने कूपर हॉस्पिटल (मुंबई)च्या इमर्जन्सी वॉर्डमध्ये अखेरचा श्वास घेतला. दिव्या भारतीच्या मृत्यूच्या महिन्याभरानंतरच तिच्या घरी काम करणा-या अमृताचा मृत्यू झाला होता. दिव्याच्या निधनामुळे अमृता खचून गेली होती, असे म्हटले जाते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.