आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिव्या भारतीची बर्थ अ‍ॅनिव्हर्सरी:अभ्यासात हुशार नव्हती दिव्या, लग्नानंतर 'या' कारणामुळे 3 महिने माहेरीच राहिली होती

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • वडिलांना न सांगता केले होते लग्न

90 च्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्री दिव्या भारती आज आपल्यात असती तर तिने वयाची 47 वर्षे पूर्ण केली असती. 25 फेब्रुवारी 1974 रोजी मुंबईत तिचा जन्म झाला होता. तर 5 एप्रिल 1993 रोजी तिचे निधन झाले होते. अल्पावधतीच हिंदी चित्रपटसृष्टीची आघाडीची अभिनेत्री ठरलेल्या दिव्याचा मृत्यू सगळ्यांनाच धक्का देऊन गेला होता. देवावर नितांत श्रद्धा असलेल्या दिव्याने वयाच्या अवघ्या 19 व्या वर्षी जगाचा कायमचा निरोप घेतला होता. दिव्या तिच्या आईवडिलांची एकुलती एक मुलगी होती. तिला एक धाकटा भाऊ असून कुणाल भारती हे त्याचे नाव आहे.

काही वर्षांपूर्वी एका मुलाखतीत दिव्याच्या मातोश्री मीता भारती यांनी दिव्याच्या अनेक गोष्टी शेअर केल्या होत्या. मीता भारती यादेखील आता या जगात नाहीत. तीन वर्षांपूर्वी त्यांचे निधन झाले होते.

भाऊ आणि वडिलांवर करायची जीवापाड प्रेम
एका मुलाखतीत दिव्याच्या मातोश्री मीता भारती यांनी सांगितले होते, "दिव्याचे तिच्या धाकट्या भावावर जीवापाड प्रेम होते. माझा सर्वकाही हे कुणालचेच आहे, असे दिव्या नेहमी म्हणायची. वडिलांवरही तिचा खूप जीव होता. वडिलांना वर्ल्ड टूरवर घेऊन जाण्याचे तिचे स्वप्न होते. शिवाय त्यांना एक मर्सिडीज गाडी तिला घेऊन द्यायची होती. पण तिच्या या इच्छा अपूर्ण राहिल्या."

वडिलांना न सांगता केले होते लग्न
मीता यांनी सांगितल्यानुसार, दिव्याने निर्माता-दिग्दर्शक साजिद नाडियालवालासोबत प्रेमविवाह केला होता. वडील लग्नाला परवानगी देणार नाही, या भीतीपोटी तिने तिच्या वडिलांना न सांगता साजिदसोबत लग्न केले होते. पण लग्नाच्या दिवशी दिव्याने आईला फोन करुन लग्नात बोलावले होते. पण वडिलांना न सांगता लग्न करत असल्याचे सांगून आईने लग्नात येणार तिला नकार दिला होता.

लग्नानंतर माहेरी परतली होती दिव्या
20 मे रोजी दुपारी दिव्याचे लग्न झाल्यानंतर तिची आई तिला भेटायला संध्याकाळी साजिदच्या घरी पोहोचली. दोघांनीही लपून लग्न केले होते. त्यामुळे लग्नानंतर त्याच दिवशी दिव्या तिच्या आईसोबत घरी परतली. तीन महिने ती माहेरीच राहिली. अधूनमधून ती साजिदला भेटायला जात असे. त्यानंतर दिवाळीत साजिद दिव्याच्या घरी आले आणि त्यांनी दिव्याच्या वडिलांना त्यांनी लग्न केल्याचे सांगितले. दिव्याच्या वडिलांनी लग्नाला मंजुरी दिली आणि त्यानंतर दिव्या तिच्या सासरी गेली होती.

जितेंद्र होते आवडते हीरो
अभिनेते जितेंद्र दिव्याचे आवडते हीरो होते. चित्रपटात त्यांच्या हीरोईनची भूमिका साकारण्याची तिची इच्छा होती. पण दोन चित्रपटांत त्यांनी दिव्याच्या वडिलांची भूमिका साकारल्याचे मुलाखतीत मीता भारती यांनी सांगितले होते.

अभ्यास नव्हती हुशार
मीता भारती यांनी सांगितल्यानुसार, दिव्या अभ्यासात मुळीच हुशार नव्हती. तिला नीट हिंदी वाचताही येत नव्हती. अभ्यास करावा लागणार नाही, म्हणून तिने चित्रपटाची ऑफर स्वीकारल्याचे मीता यांनी सांगितले होते.

देवावर होती नितांत श्रद्धा
दिव्याची देवावर नितांत श्रद्धा होती. ती रोज उशीखाली देवाचा फोटो घेऊन झोपत असे.

बातम्या आणखी आहेत...