आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

म्युझिक माफिया वाद :सोनू निगमच्या आरोपांवर दिव्या कुमारचा पलटवार, म्हणाली - दिल्लीच्या रामलीलामध्ये 5  रुपयांत गाणे गायचे हे विसरलता का?  

मुंबई7 दिवसांपूर्वी
 • कॉपी लिंक
 • सोनू निगमच्या आरोपांना उत्तर देताना दिव्या खोसला कुमार म्हणाल्या की, गुलशनजींनी तुमचे करिअर बनवले, परंतु त्यांच्या हत्येनंतर तुम्ही दुसर्‍या कंपनीशी संबंध जोडले.
 • सोनू निगमने दिव्याचे पती भूषण कुमार यांना म्युझिक माफिया संबोधले आहे.
 • दिव्या यांनी सोनूला प्रश्न केला -‘तुम्ही आज पर्यंत किती नव्या लोकांना इंडस्ट्रीमध्ये गाण्याची संधी दिली आहे?'

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमध्ये घराणेशाहीचा वाद उफाळून आला आहे. केवळ बॉलिवूडमध्येच नव्हे तर म्युझिक इंडस्ट्रीतही घराणेशाही असल्याचा हल्लाबोल गायक सोनू निगमने केला आहे. सोनूने टी-सीरिजचे मालक भूषण कुमार यांच्या नावाचा उल्लेख करुन संगीत क्षेत्रात यांची मक्तेदारी असल्याचा आरोप केला आहे. सोनूने भूषण यांना म्युझिक माफिया म्हटले आहे. त्यानंतर भूषण कुमार यांची पत्नी आणि निर्माती-अभिनेत्री दिव्या खोसला कुमार यांनी सोनू निगमवर पलटवार केला आहे.  

इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर करुन दिव्या यांनी सोनू निगमला प्रत्युत्तर दिले आहे. सोबतच ट्रोलिंगच्या भीतीने त्यांनी आपल्या इंस्टाग्रामवरील कमेंट सेक्शन लॉक केले आहे.

दिव्या यांनी व्हिडिओमध्ये म्हटले की, 'काही दिवसांपासून सोनू निगम टी-सीरिज आणि भूषण कुमार यांच्याविरूद्ध मोहिम चालवत आहेत. टी-सीरिजने आजवर हजारो कलाकारांना ब्रेक दिला आहे. हे सर्व बाहेरील लोक असून स्टार किड्स नाहीत. मी स्वतः माझ्या यारियां या चित्रपटात रकुलप्रीत, नेहा कक्कर आणि हिमांशू कोहली यांच्यासह दहा नव्या लोकांना संधी दिली होती आणि आज हे सर्व जण प्रसिद्ध असल्याचे दिव्या यांनी म्हटले आहे.

 • दिव्याने सोनूला केला प्रश्न - तुम्ही किती लोकांना संधी दिली?

दिव्या यांनी सोनूला प्रश्न विचारला आहे.  सोशल मीडियावर कॅमेरामागे सोनूजी बोलणे खूप सोपे आहे. पण तुम्ही आज पर्यंत किती नव्या लोकांना इंडस्ट्रीमध्ये गाण्याची संधी दिली आहे? कोणालाच नाही. आज टी-सीरिजमध्ये काम करत असलेले 97 टक्के लोक हे इंडस्ट्री बाहेरील आहेत, स्टार किड्स नाहीत, असे दिव्या यांनी म्हटले आहे.

 • 'तुम्ही रामलीलामध्ये 5 रुपयांत गाणे गात होते'

दिव्या आपल्या या व्हिडिओत पुढे म्हणाल्या, तुम्ही म्हणालात की भूषण जी तुमच्याकडे येत असतं आणि लोकांशी भेट घालून देण्याची विनंती तुमच्याकडे करत असते. मी तुम्हा सगळ्यांना सांगू इच्छिते की, सोनू निगमजी स्वतः दिल्लीच्या रामलीलांमध्ये 5 रुपयांत गाणे गात असतं. गुलशन कुमार यांनी सोनू निगमला दिल्लीमध्ये राम लीलामध्ये पाहिले होते. त्यानंतर त्यांनी सोनू यांना विमानाची तिकिटे देऊन मुंबईला येण्यास सांगितले होते. गुलशन कुमार यांनी सोनू निगमला बेटा तुला मोठा स्टार बनवेन असे म्हटले असल्याचे दिव्या यांनी पुढे सांगितले. 

 • दिव्या यांनी त्यांच्या कुकची ओळख करुन दिली

दरम्यान दिव्या यांनी त्यांच्या घरात गेली कित्येक वर्षे स्वयंपाक करणाऱ्या शेरुला व्हिडिओत बोलावले. शेरु यांनी देखील व्हिडिओत सोनू निगमविषयी सांगितले. ते म्हणाले की, गुलशन यांनीच सोनूला दिल्लीहून मुंबईत आणले होते. सुरुवातीच्या काळात सोनूजवळ स्कुटी होती आणि तो काम मागण्यासाठी ऑफिसमध्ये तासन्तास बसून राहायचा. साहेबांनी त्याला खूप काम दिले. अनेक चित्रपट आणि अल्बम केले आणि आज सोनू जे काही आहे ते केवळ गुलशन कुमार यांच्यामुळेच आहे, असे शेरु यांनी सांगितले. 

 • गुलशन कुमार यांच्या निधनानंतर तुम्ही बदललात

दिव्या पुढे म्हणाल्या, 'गुलशन कुमार यांच्या हत्येनंतर तुम्हाला असे वाटले असेल की, आता टी सीरिजचे कोणतेही भविष्य नाही. भूषण केवळ 18 वर्षांचे आहेत आणि इंडस्ट्रीत कोणालाही ओळखत नव्हते. ते स्वत: तुमच्याकडे येऊन लोकांची ओळख करुन देण्यास सांगत होते. अशा परिस्थितीत तुम्ही स्वतःला सेफगार्ड करत दुस-या कंपनीत जाऊन काम सुरु केले. तेव्हा भूषण यांनी तुम्हाला आपले समजून तुमच्याकडे मदत मागितली होती आणि आज तुम्ही उपकाराची भाषा करत आहात, अशा शब्दांत दिव्या यांनी आपला रोष व्यक्त केला. 

 • अबू सालेमशी तुमचे संबंध होते का?

त्यानंतर दिव्या यांनी सोनू निगमचे अबू सालेमसोबत संबंध असल्याचे म्हटले आहे.  ‘भूषण कुमार यांनी अबू सालेमपासून वाचण्यासाठी सोनू निगमची मदत मागितली होती. पण सोनू निगम मी तुम्हाला प्रश्न विचारु इच्छिते की अबू सालेमपासून वाचण्यासाठी भूषण कुमार तुमच्याकडे का आले? या गोष्टीकडे लक्ष देण्यात यावे. सोनू निगमचे अबू सालेमशी संबंध होते? होतेच. म्हणून तर भूषण कुमार सोनू निगमकडे मदत मागण्यासाठी गेले आणि त्यांनी हे आपल्या व्हिडिओमध्ये म्हटले आहे’ असे त्यांनी म्हटले आहे.

 • मीटू प्रकरणात नव-याचा केला बचाव 

दिव्या पुढे म्हणाल्या, सोनूजी म्हणाले आहेत की, भूषण कुमार यांच्यावर एका मुलीने मीटूचे आरोप लावले आणि नंतर तिने माघार घेतली. मीटू एक चांगली चवळव होती, जी वाईट लोकांचा पर्दाफाशन करण्यासाठी सुरु करण्यात आली होती. पण अनेकांनी पैसे लुबाडण्यासाठी आणि ब्लॅकमेलिंगसाठी याचा गैरवापर केला. त्यावेळी आम्ही फक्त पोलिसांचीच मदत घेतली आणि हे ब्लॅकमेलिंगचे प्रकरण अशल्याचे स्पष्ट झाले होते. परंतु आम्ही कुठेही याचा उल्लेख केला नाही, कारण आम्हाला त्या मुलीचे नाव जगजाहीर करायचे नव्हते. मात्र तुमच्यासारखे लोक आज याचा फायदा घेत आहेत, असे त्या म्हणाल्या. 

 • दिव्या म्हणाल्या- मी तुमच्यावर आरोप करू का?

सोनूजी मी जर तुमच्यावर मीटूचा आरोप केला तर तुम्ही  मीटू रेपिस्ट व्हाल का?, असा प्रश्नदेखील दिव्या यांनी सोनूला विचारला आहे. त्या म्हणाल्या,  म्हणून विचारपूर्वक व्हिडिओ बनवा. पुढच्या वेळेस पुराव्याशिवाय आरोप करु नका. तुमचा व्हिडिओ पाहिल्यानंतर, नवीन आलेल्या लोक ब्लॅकमेलिंग सुरु केल्याचे दिव्या यांनी उघड केले.  

 • बलात्काराच्या धमक्या मिळत आहेत : दिव्या

दिव्या यांनी खुलासा केला की, सोनू निगमचा व्हिडिओ समोर आल्यानंतर त्यांच्या नव-याला जीवे मारण्याच्या आणि त्यांना स्वतःला बलात्काराच्या धमक्या मिळत आहेत.  मी हे सर्व का सहन करावे? तुमची मोहीम अजूनही चालू आहे, तुम्ही गायकांना एकत्र करुन टी-सीरिजविरुद्ध त्यांना भडकावत आहेत, असे दिव्या यांनी म्हटले आहे.

 • तुमच्या बायकोने तुम्ही कसे आहात ते सांगितले 

दिव्या पुढे म्हणाल्या, सोनू जी, तुम्ही कोणत्या प्रकारचे आहात, हे तुमच्या पत्नीने स्पष्ट केले आहे. जरा आठवा, तुमच्या पत्नीने तुमच्यावर सार्वजनिकरित्या कोणकोणते आरोप लावले होते आणि आता तुम्ही इतरांवर आरोप करत आहात, असा जाब दिव्या  यांनी सोनूला विचारला आहे.

 • सोनूने दिव्याच्या व्हिडिओची थट्टा केली

दिव्याचा व्हिडिओ पाहिल्यानंतर सोनू निगमनेही आपल्या इंस्टाग्राम वॉलवर तो शेअर करुन त्याची चेष्टा केली. कॅप्शनमध्ये सोनूने लिहिले, 'प्रेजेन्टिंग दिव्यययययययया खोसलललललला कुमारररररररर.. मला वाटते की त्या आपला कमेंट बॉक्स उघडण्यास विसरल्या आहेत. यामध्ये त्यांना मदत करूया.'

 • काय आहे संपूर्ण प्रकरण? 

गेल्या काही दिवसांपासून गायक सोनू निगम सोशल मीडियावर चर्चेत आहे. या चर्चा सोनू निगमने बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केल्यामुळे सुरु झाल्या होत्या. या व्हिडिओमध्ये त्याने अभिनय क्षेत्रातच नव्हे तर संगीत क्षेत्रातही घराणेशाही असल्याचा मुद्दा उपस्थित केला. सोमवारी शेअर केलेल्या व्हिडिओत त्याने कोणाचे नाव घेतले नव्हते. मात्र त्यानंतर पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये त्याने टी-सीरिजचे मालक आणि निर्माते भूषण कुमार यांच्यावर टीका केली होती. भूषण कुमार, आता मला तुझे नाव घ्यावेच लागेल. तू चुकीच्या माणसाशी पंगा घेतलास, अशा इशारा सोनूने त्यांना दिला होता. 

0