आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

वाद:सोनू निगमवर भडकली भूषण कुमारची पत्नी  दिव्या, कृतघ्न असल्याचे सांगून म्हणाली - 'टी-सीरिजने तुम्हाला ब्रेक दिला होता' 

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • दिव्या कुमार खोसला म्हणाली, सोनूसारख्या व्यक्तींना लोकांच्या मनाशी खेळणे उत्तम जमते.
Advertisement
Advertisement

भूषण कुमार आणि सोनू निगम यांच्या वादावर आता भूषण यांची पत्नी आणि अभिनेत्री दिव्या कुमार खोसलाची प्रतिक्रिया आली आहे. तिने सोनूवर खोटी मोहीम राबवल्याचा आरोप केला आहे. दिव्याने आपल्या इंस्टा स्टोरीमध्ये सोनू निगमला कृतघ्न म्हटले आहे. सोबतच टी-सीरिजने पहिला ब्रेक दिल्याची आठवणही तिने सोनूला करुन दिली आहे. 

  • 'लोकांच्या मनाशी खेळणे उत्तम जमते'

दिव्याने लिहिले की, "कोण किती चांगली मोहिम राबवू शकतं, यावरच आज सगळं काही सुरु आहे. इतकेच नाही तर मी खोटं विकताना पाहिले आहे आणि आपल्या स्टाँग कॅम्पेनच्या माध्यमातून फसवणूक करतानाही बघतेय. लोकांच्या मनाशी कसे खेळायचे हे ठाऊन असलेल्या लोकांपैकी सोनू निगम एक आहे. देवच जगाला वाचवू शकतो", अशी प्रतिक्रिया दिव्याने दिली आहे. 

दिव्याच्या इंस्टा स्टोरीचा प्रिंट शॉट
  • सोनूला म्हटले उपकारांची जाण नसणारा 

दिव्या इथवरच थांबली नाही. तर तिने पुढच्या इंस्टा स्टोरीमध्ये सोनूला कृतघ्न म्हटले. तिने लिहिले, "सोनू निगमजी टी-सीरिजने आपल्याला इंडस्ट्रीत ब्रेक दिला. तुम्हाला यशोशिखरावर पोहोचवले. जर तुम्हाला काही तक्रार होती तर तुम्ही भूषणला का बोलला नाहीत. आज तुम्ही प्रसिद्धीसाठी हे सर्व का करत आहात. तुमच्या वडिलांचे मी स्वतः बरेच व्हिडीओ दिग्दर्शित केले आहेत, ज्यासाठी ते नेहमीच आभारी राहिले. पण काही लोकांना उपकारांची जाण नसते", असे खोड बोल दिव्याने सोनूला सुनावले आहेत. 

दिव्याने आपल्या इंस्टा स्टोरीवर ही पोस्ट शेअर केली आहे.

शेवटी दिव्याने सोनू निगमने गायलेले 'अच्छा सिला दिया तूने मेरे प्यार का' या  टी-सीरिजच्या गीताच्या ओळीला हॅशटॅग केले आहे.

  • काय आहे प्रकरण? 

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमध्ये घराणेशाही आणि कंपूशाहीवरुन वादाला तोंड फुटले आहे. यातच गायक सोनू निगमने म्युझिक इंडस्ट्रीतदेखील काही जणांची मक्तेदारी असल्याचे म्हटले आहे. त्यानंतर सोमवारी सोनूने एक व्हिडीओ प्रसिद्ध करुन टी-सीरिजचे मालक भूषण कुमार यांचे नाव घेऊन त्यांना एक्सपोज करण्याची धमकी दिली. सोनूने आपल्या या व्हिडीओला ''लातों के माफिया बातों से नहीं मानते।'', असे कॅप्शन दिले.  

हेही वाचा... 

  • वाद / सोनू निगमचा टी-सीरिजचे मालक भूषण कुमारला इशारा, म्हणाला - 'माझ्याशी पंगा घेतलास तर मरीना कुंवरचा व्हिडीओ यूट्युबवर टाकेन' 
  • विवाद / गुलशन कुमार यांनी दिली होती सोनू निगमला चित्रपटात गाण्याची संधी, आता त्यांच्याच मुलाविरोधात या गायकाने उघडला मोर्चा 
  • कोण आहे मरीना? / तीन वर्षांपूर्वी उघडले होते राम रहीमचे रहस्य , म्हणाली होती - चित्रपटात काम देण्याच्या बहाण्याने बेडरुममध्ये घेऊन गेला होता
Advertisement
0