आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सिलेब्रिटींची दिवाळी:अमिताभ बच्चन, सलमान खान आणि करिना कपूरसह बॉलिवूड सिलेब्रिटींनी आपल्या चाहत्यांना दिल्या दिवाळीच्या खास शुभेच्छा

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

यावर्षी सामान्यांसह सिलेब्रिटींची दिवाळी सुद्धा वेगळ्या पद्धतीने साजरी केली जात आहे. दरवर्षी सिलेब्रिटींकडून पार्ट्या देऊन एकत्रित येऊन दिवाळी साजरी केली जायची. पण, यंदा जवळपास सर्वांनी आप-आपल्या घरीच राहून आपल्या कुटुंबियांसोबत सेलिब्रेट करण्याचा निर्णय घेतला. यासोबतच काही तारकांनी आपल्या चाहत्यांना सोशल माध्यमांमार्फत शुभेच्छा दिल्या आहेत.

बिग बी अमिताभ बच्चन यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरून चाहत्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. सोबतच, राम जन्मभूमी अयोध्येत 5,84,872 दिव्यांचा विक्रम झाल्याची गोड बातमी दिली.

करिनाची दिवाळी कुटुंबियांसोबत

करिना कपूरने आपल्या इंस्टाग्राम हँडलवरून आपला पती सैफ अली खान आणि मुलगा तैमूरसोबतचा फोटो शेअर केला आहे. सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा, सुखी राहा आणि सुरक्षित राहा असे करिनाने लिहिले आहे.

सलमान खान सध्या रियालिटी शो बिग बॉस 14 च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. त्याने सेटवरच दिवाळी सेलिब्रेट केली. या दरम्यान सलमानने लाल रंगाता प्रिंटेड ट्रेडिशनल कुर्ता पायजामा घातला होता.

प्रीति झिंटाने पूजेच्या थाळीसोबत एक सुंदर फोटो शेअर केला आहहे. या फोटोसह तिने आपल्या चाहत्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

बातम्या आणखी आहेत...