आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

54 वर्षांचा डोरेमॉन, 46,000 कोटींची कमाई:सरकारने जन्माच्या 100 वर्षांपूर्वी साजरा केला वाढदिवस, भेट म्हणून दिले जपानचे नागरिकत्व

इफत कुरेशीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

डोरेमॉन... एक छोटी रोबोटिक मांजर जी भारतातील प्रत्येक घराघरांमध्ये पोहोचली आहे. होय, आम्ही बोलतोय ते कार्टून कॅरेक्टर डोरेमॉनबद्दल...

ही मांजर दिसायला छोटीशी आहे, पण तिचे खरे वय 54 वर्षे आहे. डोरेमॉनची निर्मिती 1969 मध्ये झाली. रंजक गोष्ट म्हणजे डोरेमॉनचा जन्म 2112 साली होणार आहे, तो नोबिताचे जीवन सुकर करण्यासाठी भविष्यातून आला आहे.

वास्तविक डोरेमॉन हा शो फक्त टीव्हीपुरताच मर्यादीत नाहीये. या फ्रँचायझीमध्ये आतापर्यंत 41 फीचर फिल्म्स, 2 स्पेशल फिल्म्स, 15 शॉर्ट फिल्म्ससह अनेक शॉर्ट फिल्म्स बनवण्यात आल्या आहेत. डोरेमॉनची मजेदार कथा दर्शविणाऱ्या कॉमिक बुकने याची सुरुवात झाली. हळूहळू, डोरेमॉन जपानमधील सर्वात लोकप्रिय कार्टून पात्र बनले.

2012 मध्ये, जपानी सरकारने डोरेमॉनचा वाढदिवस त्याच्या जन्माच्या 100 वर्षांपूर्वी साजरा केला. या सेलिब्रेशनसह सरकारने डोरेमॉनला जपानमधील कावासाकी शहराचा अधिकृत निवासी म्हणूनही घोषित केले होते. एखाद्या कार्टून पात्राला देशाचे नागरिकत्व मिळण्याची ही बहुधा पहिलीच घटना असावी.

डोरेमॉनवर आधारित फीचर फिल्म्सनी आतापर्यंत जगभरात 13 हजार कोटींची कमाई केली आहे, यावरुनच त्याच्या लोकप्रियतेचा अंदाज लावता येतो. रॉयल्टीतून त्याची कमाई 33 हजार कोटी म्हणजेच एकूण 46 हजार कोटी आहे. 3 सप्टेंबर याच दिवशी डोरेमॉनचा वाढदिवस साजरा केला जातो. डोरेमॉन भारतातील 48 कोटी लोक पाहतात, ज्यात मुले आणि प्रौढांचा समावेश आहे.

हे कार्टून भारतात इतके लोकप्रिय का आहे? 14 वर्षे डोरेमॉनची व्हॉईस आर्टिस्ट असलेल्या सोनल कौशलकडूनही या प्रश्नाचे उत्तर आपण जाणून घेणार आहोत. तसेच, डोरेमॉनचा व्यवसाय जगभरात किती पसरला आहे हे देखील जाणून घेऊया-

डोरेमॉन बनवण्याची कल्पना कशी सुचली?

डोरेमॉन हे लेखक फुजीको एफ. फुजीओ यांनी तयार केलेले जपानी काल्पनिक पात्र आहे. लेखक फुजीको यांना मांगा मासिकासाठी (जपानचे ग्राफिकल कॉमिक) काहीतरी नवीन करायचे होते. फुजीको, जे नवीन कल्पनेच्या शोधात होते, त्यांना वाटले की त्यांच्याकडे एखादे मशीन असावे जे त्यांच्या अडचणी दूर करु शकेल. असा विचार करत असताना ते त्यांच्या मुलीच्या खेळण्यावर पाय पडून खाली कोसळले. आणि शेजारीच मांजरांच्या भांडणाचा आवाज ऐकू आला. या तीन घटना एकत्र करून त्यांना प्रगत गॅजेट्स असलेल्या मांजरीचे पात्र साकारण्याची कल्पना सुचली.

डोरेमॉनचा अर्थ काय?

डोरेमॉन हे मिश्र नाव आहे, जिथे डोरा म्हणजे भटका, तर इमॉन हे जपानी पुरुष नाव आहे. म्हणजे भटका माणुस असा त्याचा अर्थ होतो.

डोरेमॉन भारतात कसा पोहोचला?

2005 मध्ये, डोरेमॉन डिस्ने इंडियाच्या हंगामा टीव्ही चॅनेलवर प्रसारित झाला. प्रेक्षकांनी या शोला भरभरून प्रेम दिले आणि ते एक एव्हरग्रीन कार्टुन बनले. वाढती लोकप्रियता पाहून हंगामा टीव्ही व्यतिरिक्त हा शो डिस्ने चॅनलवर प्रसारित होऊ लागला.

डोरेमॉन भारतात एवढा लोकप्रिय का आहे, या प्रश्नाचे उत्तर भारतात जवळपास 14 वर्षांपासून डोरेमॉनचा आवाज असलेल्या सोनल कौशलकडून मिळेल-

  • डोरेमॉन भारतात इतके लोकप्रिय का आहे?

उत्तर- डोरेमॉन भारतात प्रचंड लोकप्रिय आहे, कारण अनेक मुले त्याच्याशी खूप चांगल्या प्रकारे कनेक्ट होतात. लहान मुलांना वाटते की आमच्याकडेही डोरेमॉन असता, जो आम्हाला गॅझेट देईल आणि आमचे काम सोपे करेल. आमच्याकडे डोरेमॉन असते तर आम्ही काहीही केले असते. प्रत्येक मुलाला त्यांच्या आयुष्यात डोरेमॉनची गरज असते. म्हणूनच मुले मनाने त्याच्याशी कनेक्ट होता आणि त्याला पसंत करतात.

  • डोरेमॉनचा मुलांवर वाईट परिणाम होतो का?

उत्तर- माझ्या मते कोणत्याही गोष्टीचा मुलांवर वाईट परिणाम होतो. अनेकवेळा पालक मला सांगतात की नोबिताला पाहून आमचे मूल खूप खोडकर किंवा हट्टी झाले. कोणत्या मुलाला कोणत्या पात्राने प्रेरित केले आहे यावर ते अवलंबून असते. मला वाटते जर आपण सकारात्मकतेवर लक्ष केंद्रित केले तर आपण सकारात्मकतेने प्रेरित होऊ.

  • डोरेमॉनचा आवाज बनण्यात कोणती आव्हाने होती?

उत्तर- जेव्हा मी डोरेमॉन सुरू केले तेव्हा मी 13-14 वर्षांची होते. तेव्हा माझा नैसर्गिक आवाज खूप गोंडस होता. मी त्याला सुमारे 10-14 वर्षे डब केले. मला माझा आवाज खूप मॉड्युलेट करावा लागला. तो आवाज कायम ठेवण्यासाठी बरेच बदल करावे लागले. मी माझ्या नोकरी आणि माईक पासून हे शिकले. हा माझ्यासाठी खूप छान अनुभव होता. माझ्यासाठी हे फार कठीण नव्हते, मला फक्त माझा आवाज गोंडस करायचा होता.

  • डोरेमॉनचा आवाज कशी बनली?

उत्तर- अनेक मुलांनी डोरेमॉनचा आवाज बनण्यासाठी ऑडिशन दिले होते. प्रत्येकजण प्रत्येक पात्रासाठी ऑडिशन देत होते आणि माझा आवाज डोरेमॉनसाठी निवडला गेला. जपानी भाषेतील डोरेमॉनचा आवाज खूप रोबोटिक होता आणि मी त्या आवाजाच्या अगदी जवळ होते. काही वेळाने त्यांना माझा नैसर्गिक आवाज इतका आवडला की ते म्हणाले की आम्हाला तुमच्या मूळ गोंडस आवाजात पुढे जायला आवडेल. अशा प्रकारे डोरेमॉनला हिंदीत गोंडस आवाज मिळाला.

  • डोरेमॉनचा आवाज कधीपासून आहे?

मी 14 वर्षांपासून डोरेमॉनचा आवाज आहे. डोरेमॉनने मला देशातील मुलांशी जोडले आहे. आजही जेव्हा मी मुलांना भेटते तेव्हा ते मला डोरेमॉन म्हणतात, तेव्हा मला ते खूप आवडते.

  • डोरेमॉन हा भारतातील सर्वाधिक बघितला जाणारा कार्टून शो आहे

480 मिलियन म्हणजे 48 कोटी दर्शकांसह डोरेमॉन हा भारतातील सर्वाधिक रेट केलेला मुलांचा शो आहे. या प्रेक्षकांमध्ये केवळ लहान मुलांचाच नाही तर प्रौढांचाही समावेश आहे.

1980 मध्ये आला होता डोरेमॉनचा पहिला चित्रपट
डोरेमॉनवर आधारित पहिली फिचर फिल्म, 'डोरेमॉन: नोबिट्स डायनासोर' 1980 मध्ये रिलीज झाला होता. तेव्हापासून ते 2022 पर्यंत (2005 आणि 2021 वगळता), दर वर्षी डोरेमॉनचा एक वैशिष्ट्यपूर्ण चित्रपट प्रदर्शित होतो. फ्रेंचायझीचा शेवटचा चित्रपट, 'डोरेमॉन : नोबिताज लिटिल स्टार वॉर्स 2021' 4 मार्च 2022 रोजी प्रदर्शित झाला होता. केवळ तीन दिवसांत त्याची 3.5 लाख तिकिटे आणि पहिल्या वीकेंडमध्ये 6.6 लाख तिकिटे विकली गेली होती. या चित्रपटाने जगभरात 171 कोटी रुपयांचे कलेक्शन केले होते.

डोरेमॉनचे 41 चित्रपट प्रदर्शित झाले आहेत, तर त्याचा आगामी चित्रपट डोरेमॉन - नोबिटाज स्काय यूटोपिया मार्च 2023 मध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या 41 फ्रेंचाइजी चित्रपटांचे एकूण कलेक्शन 13 हजार कोटी आहे.

एका चित्रपटाची कमाई 1459 कोटी रुपये

2014 साली रिलीज झालेला स्टँड बाय मी डोरेमॉन हा चित्रपट या फ्रेंचायझीचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट आहे. जपानमध्ये या चित्रपटाचे कलेक्शन 479 कोटी रुपये होते, तर जगभरात त्याचे कलेक्शन 1459 कोटी रुपये होते.

मुलांवर वाईट परिणाम होण्याच्या भीतीने डोरेमॉनवर 2 देशांमध्ये बंदी

2016 मध्ये पाकिस्तानमध्ये डोरेमॉन शोवर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली होती. या शोचा मुलांवर वाईट परिणाम होत असल्याचे त्यांचे मत होते. 3 वर्षानंतर या शोवर पाकिस्तानमध्ये बंदी घालण्यात आली. 2016 मध्ये अनेक कंपन्यांच्या विरोधात तक्रार करत डोरेमॉन आणि शिनचॅन सारख्या शोवर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली होती, तरीही भारतात त्यावर बंदी घालण्यात आली नव्हती. बांगलादेशमध्ये डिस्ने चॅनल इंडियावरही बंदी घालण्यात आली आहे.

डोरेमॉनच्या क्रेझचे विज्ञान

डोरेमॉन हे 25 देशांमध्ये पाहिले जात आहे आणि ते सर्वत्र सर्वात आवडते कार्टून पात्र आहे. याच्या मेकिंगदरम्यान त्या गोष्टींची काळजी घेतली गेली ज्यामुळे त्याची क्रेझ वाढते.

1. डोरेमॉनचा आकार इतका सोपा आहे की मुलांना ते पटकन लक्षात राहते आणि ते स्वतः डिझाइन देखील करू शकतात.

2. डोरेमॉनकडे अनेक गॅजेट्स आहेत ज्यामुळे त्याचा मित्र नोबिताचे आयुष्य सोपे होते. सर्व मुले अशा गॅझेट्सबद्दल विचार करतात. जसे होमवर्क करण्यासाठी एखादे गॅझेट, आवडते पदार्थ देणारे गॅझेट किंवा सहजपणे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेले जाणारे गॅझेट, अशा गॅझेटचा मुले विचार करु लागतात.

3. डोरेमॉनचे वागणे हे देखील त्याच्या वाढत्या क्रेझचे एक कारण आहे. तो इतका सरळ आणि समजूतदार बनवला गेला आहे की तो नोबिताला सर्व प्रकारे मदत करतो, पण सोबतच नैतिक मूल्येही शिकवतो.

4. नोबिता एक आळशी मुलगा आहे ज्याला शाळेत मार्क्स कमी मिळतात आणि त्याचे मित्र त्याची चेष्टा करतात. अनेक मुले या कथानकाशी थेड जोडली जातात.

5. जपानमध्ये शिस्तीला खूप महत्त्व दिले जाते, परंतु नोबिता याउलट एक आळशी मुलगा आहे. जपानी लोक नोबिताला 'सिम्बॉल ऑफ ट्रू फीलिंग' म्हणतात कारण प्रत्येकाला त्याच्यासारखे जगायचे असते.

(स्रोत- manga.tokya)

हॅपी एंडिंगवरुन झाला वाद

लेखक फुजीको यांच्या मृत्यूनंतर, 1996 नंतर मालिका प्रसारित करणे बंद करण्यात आले. शो निष्कर्षापर्यंत पोहोचण्याआधीच लेखकाचा मृत्यू झाला होता, ज्यामुळे प्रेक्षकांना खूप दुःख झाले. वर्षभर खूप वाद झाले की डोरेमॉनचा शेवट काय होणार?

कॉमिक व्यंगचित्रकार यासू टी ताजिमा यांनी या मालिकेचा शेवट केला आणि 1998 मध्ये इंटरनेटवर शेअर केला होता. त्याचे कॉमिक 2005 मध्ये प्रकाशित झाले होते. कथानकानुसार, डोरेमॉनची बॅटरी डेड होते. नोबिता डोरेमॉनला रोबोटिक इंजिनिअर म्हणून पुन्हा तयार करतो आणि ते आनंदाने जगतात. अधिकृत सदस्यांच्या माहितीशिवाय असा आनंददायी शेवट लिहिल्याबद्दल, ताजिमा यांनी 2007 मध्ये माफी मागितली आणि कॉमिकचा नफा Fujiko-Pro सोबत शेअर केला.

डोरेमॉनचा शेवट कसा असेल?

स्टँड बाय मी डोरेमॉनचे दिग्दर्शक युची यागी आणि ताकाशी यामाझाकी यांनी अनेक एंडिगचा विचार केला असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. मात्र अद्याप काहीही अंतिम झालेले नाही. त्यांच्या मते, डोरेमॉनचा एकमेव शेवट होऊ शकतो तो म्हणजे नोबिता आणि शिझुका यांचे लग्न होईल, ज्यामुळे डोरेमॉनचे मिशन पूर्ण होईल आणि तो भविष्याकडे परत येईल.

बातम्या आणखी आहेत...