आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हेल्थ अपडेट:डॉ. जलील पारकर म्हणाले - दिलीप साहेबांच्या प्रकृतीत सुधारणा होतेय, पण अद्याप ते ऑक्सिजन सपोर्टवर आहेत

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • डॉ. जलील पारकर यांनी दिलीप साहेबांच्या प्रकृतीविषयी एक अपडेट दिला आहे.

ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांना श्वासोच्छवासाच्या त्रासामुळे काही दिवसांपूर्वी मुंबईच्या पीडी हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आता नुकतेच दिलीप कुमार यांच्यावर उपचार करणारे पल्मोनोलॉजिस्ट डॉ. जलील पारकर यांनी त्यांच्या प्रकृतीविषयी एक अपडेट दिला आहे. दिलीप कुमार यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे, पण सध्या ते ऑक्सिजन सपोर्टवर असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

डॉ. जलील पारकर म्हणाले, "दिलीप कुमार यांची तब्येत सुधारत आहे आणि त्यांचा श्वसनाचा त्रासही काही प्रमाणात कमी झाला आहे. परंतु ते अद्याप ऑक्सिजन सपोर्टवर आहेत.' त्याआधी रविवारी डॉ. पारकर म्हणाले होते, "दिलीप कुमार यांची प्रकृती आता स्थिर आहे. ते आयसीयूमध्ये आहेत पण व्हेंटिलेटरवर नाहीत. ते लवकरात लवकर बरे व्हावे आणि घरी परतावे यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करीत आहोत," असे पारकर यांनी सांगितले होते.

दिलीप कुमार यांच्या फुफ्फुसात पाणी जमा झाले
दैनिक भास्करसोबत बोलताना रुग्णालयातील डॉ. जलील पारकर यांनी सांगितले होते, 'दिलीप कुमार यांच्या फुफ्फुसात पाणी जमा झाले आहे. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करुन घेण्यात आले आहे. त्यांची ऑक्सिजनची पातळीदेखील वर-खाली जात आहे. मात्र ते व्हेंटिलेटर नाहीत. वयोमानामुळे त्यांना हा त्रास झाला आहे. सध्या त्यांना किती काळ रुग्णालयात राहावे लागेल, याविषयी अद्याप काही सांगता येत नाही.'

98 वर्षीय दिलीप कुमार यांना बायलेटरल प्ल्यूरल इफ्यूजन झाले होते. या आजारात छातीत पाणी भरले जाते. याला वैद्यकीय भाषेत प्ल्यूरल इफ्यूजन म्हटले जाते. छातीत वारंवार पाणी जमा झाल्याने फुफ्फुसांवर ताण वाढतो आणि त्याने श्वास घेण्यास त्रास होतो.

दिलीप कुमार यांचा रुग्णालयातील पहिला फोटो समोर आला होता
सोमवारी संध्याकाळी दिलीप कुमार यांच्या सोशल मीडिया हँडलवरुन रुग्णालयातील त्यांचा पहिला फोटो शेअर करण्यात आला होता. या फोटोत दिलीप कुमार ऑक्सिजन सपोर्टशिवाय दिसले. त्यावरुन पुर्वीपेक्षा त्यांच्या प्रकृतीत सुधारणा असल्याचे दिसून आले. या फोटोत दिलीप साहेबांच्या पत्नी सायरा बानो त्यांच्यासोबत दिसल्या. हा फोटो 7 जून रोजी सायंकाळी 5:51 वाजता क्लिक केल्याची माहिती देण्यात आली होती.

मागील महिन्यातही रुग्णालयात झाले होते दाखल

यापूर्वी मे महिन्यात दिलीप कुमार यांना हिंदूजा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण नेहमीच्या काही चाचण्या करण्यासाठी त्यांना रुग्णालयात दाखल केल्याचे सायरा बानो यांनी सांगितले होते. ‘आम्ही रुग्णालयात केवळ रुटिन चेकअप करण्यासाठी आलो आहोत,’ असे सायरा बानो म्हणाल्या होत्या.

दिलीप कुमार पद्मभूषण, दादासाहेब पुरस्काराने सन्मानित

दिलीप कुमार यांचे खरे नाव मोहम्मद युसूफ खान आहे. त्यांनी 'ज्वार भाटा' (1944), 'अंदाज' (1949), 'आन' (1952), 'देवदास' (1955), 'आझाद' (1955), 'मुगल-ए-आजम' (1960), 'गंगा' जमुना (1961), 'क्रांती' (1981), 'कर्मा' (1986) आणि 'सौदागर' (1991) यासह 50 हून अधिक बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले आहे.

फिल्मफेअरचे 1954 चे उत्कृष्ट अभिनेत्याचे पारितोषिक मिळवणारे दिलीप कुमार हे पहिले अभिनेते आहेत. त्यांना आठ वेळा या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. 1991 मध्ये भारत सरकारने पद्मभूषण देऊन त्यांचा गौरव केला आहे. भारतीय चित्रपटसृष्टीतील महत्वपूर्ण योगदानाबद्दल 1994 ला दादासाहेब फाळके पुरस्कार देऊन दिलीप कुमार यांना गौरवण्यात आले आहे. राष्ट्रपती कोट्यातून 2000-2006 दरम्यान त्यांना राज्यसभेचे सभासदत्व देण्यात आले होते. पाकिस्तान सरकारने 1998 मध्ये त्यांना ‘निशान-ए-इम्तियाझ’ हा पाकिस्तानमधील सर्वात उच्च असे नागरी पारितोषिक देऊन सन्मानित केले आहे.

बातम्या आणखी आहेत...