आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बातचीत:कपूर घराण्याच्या 4 पिढ्यांवर उपचार करणारे 92 वर्षीय डॉक्टर ओ.पी. कपूर म्हणाले  - चरणस्पर्श फक्त ऋषीच करायचे

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
रणबीर कपूर, ओपी कपूर, ऋषी कपूर आणि रणधीर कपूर - Divya Marathi
रणबीर कपूर, ओपी कपूर, ऋषी कपूर आणि रणधीर कपूर
  • डॉक्टर ओ.पी. कपूर म्हणाले - ऋषी कपूर पिता राज कपूर यांना ‘सर’ म्हणायचे...

ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचे 30 एप्रिल रोजी निधन झाले. ते 67 वर्षांचे होते. गेल्या दीड वर्षांपासून ते ल्युकेमिया (ब्लड कॅन्सर) या आजाराशी लढा देत होते. श्वास घेण्यात त्रास आणि छातीत संसर्ग झाल्याने त्यांना 29 एप्रिल रोजी मुंबईतील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. 2018 मध्ये ऋषी यांना कॅन्सरचे निदान झाले होते. उपचारासाठी ते वर्षभर न्यूयॉर्कमध्ये होते. गेल्याचवर्षी सप्टेंबर महिन्यात ते उपचार घेऊन भारतात परतले होते.  

कपूर घराण्याच्या चार पिढ्यांवर उपचार करणारे 92 वर्षीय डॉक्टर ओपी कपूर यांच्याशी भास्करने खास बातचीत केली. या मुलाखतीत डॉ. कपूर यांनी कपूर घराण्याशी संबंधित काही खास गोष्टी शेअर केल्या.   

चरणस्पर्श फक्त ऋषीच करायचे... 

ओपी कपूर सांगतात, ‘मी कपूर घराण्यातील 3 पिढ्यांतील मृत्यूंचा साक्षीदार आहे. मी 92 व्या वर्षी हे पाहण्यासाठी का जिवंत आहे? पाच वर्षांपूर्वी ऋषी यकृताचा रिपोर्ट घेऊन आले तेव्हा खूप घाबरलेले होते. सांगत होते - अंकल! डॉक्टर म्हणाताहेत यकृत पूर्ण गेले आहे. मी त्यांना ठाणे येेथे घेऊन गेलो. तेथे लिव्हर टेस्टिंगचे अद्ययावत तंत्र होते. चाचण्या झाल्या, मात्र तसे काही नव्हते. ऋषी खुश झाले आणि मला मिठी मारली. मी म्हणालो- ऋषी कमी प्या, कमी खा, फॅट कमी करा. मात्र पिणे आणि पंजाबी पदार्थ ही कपूर घराण्याची कमजोरी आहे. ऋषी तर कमालच होते. मात्र, राज कपूर व शम्मीही असेच होते. त्यांना आलू-कोबी पराठे, बटर चिकन, तंदुरी चिकन, दारू हवीच असे. ऋषी नियमित जिमला जात होते. मात्र तरीही...!

चांगल्या वागण्यासाठी ऋषी यांची नेहमी आठवण येईल. सध्या कपूर घराण्यात एकमेव ऋषीच वेल बिहेव्ड होते. भेटायचे तेव्हा पूर्ण वाकून चरणस्पर्श करायचे. काही वर्षांपूर्वी त्यांना त्यांचे काही रिपोर्ट‌्स दाखवायचे होते. त्यांना मी रॉयल वेलिंग्टन स्पोर्ट‌॰स क्लबमध्ये बोलावले. मी मीटिंगमध्ये होतो, ऋषी एकदम आत आले आणि चरणस्पर्श करत म्हणाले - पैरी पौना अंकल... तेथे उपस्थित सर्व चकित झाले. आजकाल लोक फक्त थोडेसे कमरेत वाकतात, चरणस्पर्श फक्त ऋषीच करत होते. ऋषी पिता राज कपूर यांना सर संबोधायचे. मी कधीच त्यांना पापा म्हणताना ऐकले नाही.

मी पृथ्वीराज कपूर यांच्यावरही उपचार केले आहेत. जेव्हा पृथ्वीराज यांना सांगितले की कॅन्सर आहे, तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरची रेषादेखील हलली नाही. विचारू लागले- मी मरेन का? मी सांगितले, आताच नाही. नंतर म्हणायला लागले, माझ्यामुळे एखादा निर्माता मरायला नको. तेव्हा ते 17 चित्रपटांत काम करत होते. नंतर सर्व चित्रपट पूर्ण केले. त्यानंतर ऋतू कॅन्सरने गेली. आता ऋषीचा या आजाराने बळी घेतला.

बातम्या आणखी आहेत...