आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

स्पेशल:करीना कपूरची डिलिव्हरी करणा-या 91 वर्षीय पारसी डॉक्टरांनी केली अनुष्का शर्माची डिलिव्हरी, करीनाची दुसरी डिलिव्हरीसुद्धा हेच डॉक्टर करतील ​​​​​​​

किरण जैन3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • वैद्यकीय जगात डॉ. रुस्तम सोनावाला यांना डॉ. आर. पी सोनावाला या नावाने ओळखले जाते.

बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माने 11 जानेवारी रोजी दुपारी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात मुलीला जन्म दिला. रुग्णालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अनुष्का गरोदरपणात 91 वर्षीय पारसी डॉ. रुस्तम सोनवाला यांच्याकडे उपचार घेत होती आणि त्यांनीच तिची डिलिव्हरी केली. डॉ. सोनावाला हे वैद्यकीय क्षेत्रातील एक मोठे नाव असून त्यांना 1991 मध्ये पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आले होते. वैद्यकीय जगात डॉ. रुस्तम सोनावाला यांना डॉ. आर. पी सोनावाला या नावाने ओळखले जाते.

करीनाची दुसरी प्रसुतीही हेच डॉक्टर करतील
20 डिसेंबर 2016 रोजी ब्रीच कँडी रुग्णालयात तैमूरला जन्म दिला होता. सूत्रांच्या माहितीनुसार, करीना आपली दुसरी प्रसुतीही त्यांच्याकडूनच करुन घेणार आहे. येत्या फेब्रुवारी महिन्यात करीना तिच्या दुस-या बाळाला जन्म देणार आहे.

डॉ.सोनावाला कोण आहेत?
पद्मश्री डॉ. रुस्तम फिरोझ सूनावाला हे वैद्यकीय क्षेत्रातील अतिशय प्रसिद्ध नाव आहे. डॉ. सोनावाला हे 91 वर्षांचे असून त्यांनी 1948 मध्ये प्रॅक्टिस सुुरु केली होती. सोनवाला यांनी त्यांच्या आत्मचरित्रात म्हटले आहे की, “त्या वेळी डॉक्टर रूग्णांची नाडी पाहून उपचार करत होते. डायग्नोस्टिक प्रक्रिया आणि रक्तगटासारख्या गोष्टी नंतर आल्या." रुस्तम यांनी इंट्रा गर्भाशय गर्भनिरोधक यंत्राचा शोध लावला आणि 1991 मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले गेले. लेखिका रश्मी उदयसिंग यांनी डॉ. सोनवाला यांच्यावर एक पुस्तक लिहिले असून त्याचे नाव लाइफ गिव्हर हे आहे.

करीनाची आई बबिताचीही प्रसुती याच डॉक्टरांनी केली होती
रंजक बाब म्हणजे करिश्मा आणि करीनाच्या जन्माच्या वेळी पद्मश्री डॉ. रुस्तम फिरोझ सूनावाला यांनीच करीनाची आई बबिताची डिलिव्हरी केली होती. याशिवाय नीतू सिंह, गौरी खान, जया बच्चन यांचीही डिलिव्हरी यांनीच केली होती. कपूर-बच्चन कुटुंबीयांव्यतिरिक्त डॉ सोनवाला यांनी विजय माल्ल्यांच्या पत्नीचीदेखील प्रसुती केली होती.

विराटने रुग्णालयात प्रायव्हसीची काळजी घेतली
अनुष्का शर्मा आणि विराट कोहली हे देशातलं स्टार कपल आहे. बाळाच्या जन्मानंतर विराट-अनुष्काने इस्पितळातून कोणाकडूनही फुलं किंवा भेटवस्तू न घेण्याचा निर्णय घेतला आहे. कोविड वातावरणात दोघांनी हा निर्णय घेतल्याचं सांगण्यात येत आहे. एवढंच नाही तर इस्पितळातील कर्मचार्‍यांना फोटो न काढण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. इस्पितळातली सुरक्षाही आधीपेक्षा अधिक कडक करण्यात आली आहे. जे लोक आजूबाजूच्या रूम्समध्ये दाखल आहेत त्यांना भेटायला येणाऱ्यांना आणि इतर कर्मचाऱ्यांना मुलीची झलक दिसू नये याची खास सोय करण्यात आली आहे. इस्पपितळाच्या बाहेर छायाचित्रकारांची असलेली गर्दी पाहून अनुष्का आणि मुलीला मागच्या दाराने घरी पाठवण्याचा विचार केला जात असल्याचेही बोलले जात आहे.

बातम्या आणखी आहेत...