आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अपकमिंग प्रोजेक्ट:'ड्रीम गर्ल 2'मध्ये वेगवेगळे आवाज काढणार आयुष्मान, जूननंतर सुरु होणार राज शांडिल्यच्या चित्रपटाचे चित्रीकरण

अमित कर्णएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • महिलेच्या आवाजात बोलणार नाही नायक
  • जून 2021 नंतर सुरू होऊ शकते ‘ड्रीम गर्ल 2’ चे चित्रीकरण
  • नुसरत आणि अन्नूही असतील चित्रपटात

आयुष्मान खुराना सध्या आसाम इथे दिग्दर्शक अनुभव सिन्हा यांच्या एका सस्पेन्स थ्रीलर चित्रपटाच्या चित्रीकरणामध्ये व्यस्त आहे. यानंतर तो लगेचच एका विनोदी चित्रपटाचे शुटिंगही करणार आहे. ‘डॉक्टर जी’ हा त्यापैकी एक चित्रपट आहे, ज्याची अधिकृत घोषणा झालेली आहे. यानंतर तो राज शांडिल्य यांच्या ‘ड्रीम गर्ल’ च्या सीक्वेलच्या शुटिंगला सुरूवात करू शकतो, ज्याची अधिकृत घोषणा येत्या काही दिवस होण्याची शक्यता आहे. दैनिक भास्करला दिलेल्या खास मुलाखतीत राज यांनी ही माहिती दिली.

यावेळेस हीरोचे प्रोफेशन वेगळे असेल
या चित्रपटाच्या सिक्वेलबद्दल बोलायचे झाले तर यावेळी चित्रपटातल्या नायकाचे प्रोफेशन थोडे वेगळे असेल. या चित्रपटाला आम्ही सीक्वेल आणि फ्रेंचाइजी अशा दोन्ही पातळ्यांवर डेव्हलप करतो आहोत. म्हणजेच जिथे चित्रपटाच्या पहिल्या भागाचा शेवट झाला आहे तिथूनच दुसऱ्या भागाची सुरूवात होणार आहे. चित्रपटाच्या कथेची पार्श्वभुमी सुद्धा मथुरा आणि वाराणसी हीच असेल. फक्त हीरोचे प्रोफेशन वेगळे असेल.

सर्वात आधी आयुष्मानकडे जाईल प्रत्येक स्क्रिप्ट
राज यांनी सांगितले की ‘ड्रीम गर्ल 2’ ची स्क्रिप्ट लिहिण्याचे काम सुरू आहे. पहिला भाग लिहिल्यानंतर मी आयुष्मान म्हटले देखील की मी ज्या कुठल्या चित्रपटाचे लेखन पहिल्यांदा करेल त्यामध्ये आयुष्मानलाच संधी देईन. जर आयुष्मानने काही कारणाने नकार दिला तर आणि तरच मी इतर कुणाचा विचार करेन. असो, सध्या हे सीक्वेल लिखाणाच्या प्रक्रियेत आहे. त्यामुळे मी अजुनपर्यंत तरी त्याला स्क्रिप्ट वाचून दाखवलेली नसली तरी तो हा चित्रपट करणार हे 99 टक्के नक्की आहे. जोपर्यंत यासंदर्भातल्या करारावर सह्या वगैरे होत नाही तोपर्यंत उरलेला एक टक्का ही गोष्ट मी अनिश्चित मानतो आहे. चित्रपटाच्या बाकी सहकलाकारांमध्ये नुसरत भरुचा आणि अन्नू कपूर हे दोघेही अगदी 100 टक्के आहेत.

नुसरत भरुचा आणि आयुष्मानसोबत ड्रीम गर्लचे राइटर राज शांडिल्य
नुसरत भरुचा आणि आयुष्मानसोबत ड्रीम गर्लचे राइटर राज शांडिल्य

ओमंगच्या ‘फौजा सिंह’चीदेखील करणार निर्मिती
या चित्रपटाव्यतिरिक्त राज काही इतर चित्रपटाचीही निर्मिती करणार आहे, त्यात ‘फौजा सिंह’च्या बायोपिकचादेखील समावेश आहे. याचे दिग्दर्शन ओमंग कुमार करणार आहेत. चित्रपटासाठी कलाकारांची निवड झाली आहे. याविषयी लवकरच घोषणा करण्यात येईल. ऑगस्टमध्ये याचे शूटिंग सुरू होणार आहे. याशिवाय आणखी एका सामाजिक विषयावर विनोदी लेखन करत आहे. ते भावनिकदेखील असेल. तो आनंद चित्रपटासारखा असेल. त्यावरदेखील काम सुरू आहे.

बातम्या आणखी आहेत...