आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभिनेत्रीची कोरोनाशी अपयशी झुंज:‘ड्रीम गर्ल’मधील अभिनेत्री रिंकू सिंग निकुंभचे निधन, मृत्यूच्या 25 दिवसाआधी घेतला होता कोरोना लसीचा पहिला डोस

15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 25 मे रोजी रिंकूचा कोरोना टेस्टचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता.

आयुष्मान खुराना स्टारर 'ड्रीम गर्ल' या चित्रपटात सहाय्यक अभिनेत्री म्हणून दिसलेल्या रिंकू सिंग निकुंभचे निधन झाले आहे. तिला काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. आणि बुधवारी तिने अखेरचा श्वास घेतला.

रिंकूची चुलत बहीण चंदा सिंग निकुंभ यांनी सांगितल्यानुसार, 25 मे रोजी रिंकूचा कोरोना टेस्टचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. सुरुवातीला ती घरातच क्वारंटाइन होती. परंतु जेव्हा तिचा ताप कमी झाला नाही आणि तिची प्रकृती ढासळू लागली तेव्हा तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती खालावल्यामुळे तिला आयसीयू वॉर्डमध्ये हलवण्यात आले. मात्र उपचारादरम्यान रिंकूने अखेरचा श्वास घेतला.

7 मे रोजी घेतला होता कोरोना लसीचा पहिला डोस
चंदा यांनी सांगितल्यानुसार, 7 मे रोजी रिंकूने कोविड लसीचा पहिला डोस घेतला होता आणि लवकरच ती दुसरा डोस घेणार होती. याशिवाय एका जाहिरातीच्या शुटिंगसाठी ती गोव्याला जाणार होती. पण कोविडची परिस्थिती पाहून तिच्या कुटुंबीयांनी तिला गोव्याला जाण्यापासून रोखले होते. रिंकूला दम्याचा त्रास असल्याचेही चंदा यांनी सांगितले.

अखेरची 'हॅलो चार्ली' मध्ये झळकली होती रिंकू
रिंकू सिंग निकुंभने 'ड्रीम गर्ल'मध्ये फ्रेंडशिप कॉल सेंटरमध्ये काम करणार्‍या मुलीची भूमिका साकारली होती. ती शेवटची आदर जैन आणि जॅकी श्रॉफ स्टारर 'हॅलो चार्ली' या वेब सीरिजमध्ये दिसली होती. चित्रपट आणि वेब सीरिज व्यतिरिक्त रिंकूने 'चिडियाघर' आणि 'मेरी हानिकारक बिवी' सारख्या टीव्ही मालिकांमध्येही काम केले होते.

बातम्या आणखी आहेत...