आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दृश्यम-2 चे दुसऱ्या दिवशी 22 कोटींचे कलेक्शन:बजेटचा अर्धा हिस्सा काढला

8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अजय देवगण स्टारर दृश्यम-2 ने बॉक्स ऑफिसवर दोन दिवसांत शानदार कलेक्शन केले आहे. चित्रपटाने दुसऱ्या दिवशी 21.59 कोटींची कमाई केली आहे. अशा प्रकारे चित्रपटाने दोन दिवसांत 37 कोटींचे बॉक्स ऑफिस कलेक्शन केले आहे. 15.38 कोटींच्या फर्स्ट डे कलेक्शनसह दृश्यम-2 2022 मधील दुसरी सर्वात मोठी ओपनर ठरली आहे. चित्रपटाविषयी खूप सकारात्मक प्रतिक्रिया ऐकायला मिळत आहेत. येणाऱ्या दिवसांत चित्रपटाची कमाई वाढण्याच्या शक्यता जास्त आहेत.

तरण आदर्श यांनी दुसऱ्या दिवशीचे कलेक्शन शेअर केले

सुमारे 60 कोटींच्या बजेटमध्ये तयार झालेल्या या चित्रपटाने दोनच दिवसांत बजेटच्या अर्धी कमाई केली आहे आणि हिट होण्याच्या दिशेने आणखी एक पाऊल टाकले आहे. ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यांनी चित्रपटाचे कलेक्शन शेअर करताना आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर लिहिले आहे - "दृश्यम-2 ने दुसऱ्या दिवशी कमाल केली आहे. चित्रपट उत्तर, दक्षिण, पूर्व आणि पश्चिम सर्व ठिकाणी चांगली कामगिरी करत आहे. मल्टप्लेक्समध्ये चित्रपट चांगला चालत आहे. शुक्रवारी 15.38 कोटी, शनिवारी 21.59 कोटी, एकूणः 36.97 कोटी.

2022 मधील दुसरी सर्वात मोठी ओपनर

दृश्यम-2 या वर्षातील दुसरी सर्वात मोठी ओपनर ठरली आहे. चित्रपटाचे पहिल्या दिवशीचे कलेक्शन 15.38 कोटी रुपये होते. 2022 मध्ये रिलीज होणाऱ्या सर्व हिंदी चित्रपटांत ब्रह्मास्त्रने सर्वात मोठी ओपनिंग केली होती. ब्रह्मास्त्रचे फर्स्ट डे कलेक्शन 37 कोटी होते. 15.25 कोटींसह रामसेतू दुसऱ्या क्रमांकावर होती, पण आता 15.38 कोटींच्या कलेक्शनसह दृश्यमने रामसेतूला मागे टाकले आहे.

गेल्या दोन वर्षांतील अजय देवगणची सर्वात मोठी ओपनर

अजय देवगणच्या गेल्या 2 वर्षांत रिलीज झालेल्या चित्रपटांपैकी दृश्यम-2 हा सर्वात मोठा ओपनर ठरला आहे. याआधी 2020 मध्ये रिलीज झालेला चित्रपट तान्हाजी द अनसंग वॉरियरने 15.20 कोटींचे फर्स्ट डे कलेक्शन केले होते.

मल्याळम चित्रपटाचा हिंदी रिमेक दृश्यम

दृश्यम-2 दक्षिणेतील सुपरस्टार मोहनलाल यांच्या सुपरहिट मल्याळम चित्रपट दृश्यम-2 चा हिंदी रिमेक आहे. दृश्यमचा पहिला भागही मोहनलाल यांच्या याच नावाच्या चित्रपटाचा हिंदी रिमेक होता. मल्याळममधील चित्रपटानंतर याचे अनेक भाषांत रिमेक करण्यात आले होते.

निशिकांत कामत यांच्या जागी अभिषेक पाठक यांनी केले दिग्दर्शन

अभिषेक पाठक यांच्या दिग्दर्शनात तयार झालेल्या या चित्रपटात अजय देवगण, तब्बू, श्रिया सरन आणि अक्षय खन्ना मुख्य भूमिकेत आहे. चित्रपटाच्या पहिल्या भागाचे दिग्दर्शन निशिकांत कामत यांनी केले होते. मात्र कोरोनादरम्यान त्यांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे निर्माता अभिषेक पाठक यांनीच चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा स्वीकारली.

बातम्या आणखी आहेत...