आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'दृश्यम 2'चा BTS व्हिडिओ:चित्रपटाच्या यशानंतर दिग्दर्शकाने दाखवले पडद्यामागील चित्रीकरण

8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अजय देवगणचा 'दृश्यम 2' हा चित्रपट 18 नोव्हेंबरला थिएटरमध्ये रिलीज झाला आहे. रिलीज झाल्यापासून प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाची प्रचंड क्रेझ आहे. अवघ्या तीन दिवसांत या चित्रपटाने 60 कोटींची कमाई केली आहे. दरम्यान, चित्रपटाचा एक बिहाइंड द सीन व्हिडिओ समोर आला आहे.

दिग्दर्शकाने शेअर केला हा व्हिडिओ
हा BTS व्हिडिओ चित्रपटाचे दिग्दर्शक अभिषेक पाठक यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला आहे. ज्यामध्ये तुम्ही चित्रपटाचे चित्रीकरण कसे झाले ते पाहू शकता. BTS व्हिडिओमध्ये, अजय देवगण क्लायमॅक्स सीन शूट करत आहे तर तब्बू आणि अक्षय खन्ना त्यांचे सीन शूट करताना दिसत आहेत. यादरम्यान दिग्दर्शक कलाकारांना त्यांचे सीन समजावून सांगताना दिसत आहेत. हा व्हिडिओ शेअर करत अभिषेकने कॅप्शनमध्ये लिहिले, "'दृश्यम 2'चे सीन्स असे शूट झाले आहेत, जरूर पहा! तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात 'दृश्यम 2'."

'दृश्यम 2' हा मल्याळम चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे
'दृश्यम 2' हा साऊथचे सुपरस्टार मोहनलाल यांचा ब्लॉकबस्टर मल्याळम चित्रपट 'दृश्यम 2' चा हिंदी रिमेक आहे. 'दृश्यम'चा पहिला भागसुद्धा मोहनलाल यांच्या त्याच नावाच्या चित्रपटाचा हिंदी रिमेक होता. दोन्ही मल्याळम चित्रपटांचे दिग्दर्शन जीतू जोसेफ यांनी केले होते तर हिंदीतील 'दृश्यम'चा पहिला भाग निशिकांत कामत यांनी दिग्दर्शिक केला होता. निशिकांत कामत यांच्या निधनानंतर 'दृश्यम-2'चे दिग्दर्शन अभिषेक पाठक यांनी केले.

व्हिडिओ पाहण्यासाठी वरील छायाचित्रावर क्लिक करा...

बातम्या आणखी आहेत...