आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'दृश्यम 2' ने आठ चित्रपटांना टाकले मागे:2022 मधील दुसरा सर्वात मोठा ओपनिंग चित्रपट ठरला

13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘दृश्यम 2’ हा चित्रपट 18 नोव्हेंबरला थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. सात वर्षांपूर्वी म्हणजेच 2015 मध्ये चित्रपटाचा पहिला भाग ‘दृश्यम’ प्रदर्शित झाला होता. या सीक्वेलची ॲडव्हान्स बुकिंग पाहता हा चित्रपट पहिल्या दिवशी जवळपास 12 कोटींची कमाई करेल असा अंदाज होता. मात्र, या चित्रपटाने अपेक्षेपेक्षा जास्त कमाई केली आहे. विशेष म्हणजे अजय देवगण आणि अक्षय खन्ना यांचा हा चित्रपट 2022 मधील दुसरा सर्वात मोठा ओपनर ठरला आहे. म्हणजेच 'दृश्यम 2' पहिल्या दिवशी सर्वाधिक कमाई करणारा दुसरा चित्रपट ठरला आहे.

'दृश्यम 2'चे ओपनिंग डे कलेक्शन या चित्रपटापेक्षा कमी होते
सुरुवातीच्या आकडेवारीनुसार, 'दृश्यम 2' ने पहिल्या दिवशी जवळपास 15.38 कोटी रुपयांची कमाई केली आहे. 50 कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाचा पहिल्याच दिवशी 15 कोटींहून अधिकचा व्यवसाय चांगलाच मानला जात आहे. मात्र, अजय देवगणचा चित्रपट रणबीर कपूरच्या 'ब्रह्मास्त्र'ला मागे टाकण्यात अपयशी ठरला. अयान मुखर्जीच्या चित्रपटाने पहिल्याच दिवशी जवळपास 36 कोटींचा व्यवसाय केला होता. यामुळेच 'ब्रह्मास्त्र' हा 2022 सालचा सर्वात मोठा ओपनर ठरला आहे. तर 'दृश्यम 2' दुसऱ्या स्थानावर आहे.

'दृश्यम 2' ने या आठ चित्रपटांना मागे टाकले
2022 हे वर्ष बॉलिवूड चित्रपटांसाठी फारसे खास राहिलेले नाही. या वर्षी प्रदर्शित झालेले अनेक चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरले. पण, काही चित्रपटांनी चांगली कमाई केली आणि पहिल्याच दिवशी 10 कोटींहून अधिकचा व्यवसाय केला. मीडिया रिपोर्ट्सनुसार, 'दृश्यम 2' सह, असे 10 चित्रपट आहेत. ज्यांनी पहिल्याच दिवशी 10 कोटींहून अधिक कमाई केली आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे अजय देवगणच्या 'दृश्यम 2' ने यापैकी 8 चित्रपटांना मागे टाकले आहे.

'दृश्यम 2' ने या चित्रपटांना मागे टाकले

चित्रपटबॉक्स ऑफिस कलेक्शन
राम सेतू15.25 कोटी
भूल भुलैया 214.11 कोटी
बच्चन पांडे13.25 कोटी
लाल सिंह चड्ढा11.70 कोटी
सम्राट पृथ्वीराज10.70 कोटी
विक्रम वेधा10.58 कोटी
गंगूबाई काठियावाडी10.50 कोटी
शमशेरा10.25 कोटी
बातम्या आणखी आहेत...