आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

100 कोटींच्या क्लबमध्ये 'दृश्यम 2' सामील:आठवडाभरात ठोकले शतक, केवळ 60 कोटींच्या बजेटमध्ये बनला चित्रपट

2 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अजय देवगण स्टारर 'दृश्यम 2' ने एका आठवड्यात 100 कोटींची कमाई केली आहे. रिलीजच्या सातव्या दिवशी या चित्रपटाने 8.62 कोटींची कमाई केली आहे. अशा प्रकारे चित्रपटाची एकूण कमाई 104.66 कोटींवर गेली आहे. बॉलिवूडसाठी हे वर्ष फारसे खास ठरले नाही. बॉक्स ऑफिसवर यावर्षी चांगली कमाई करणारे खूप कमी चित्रपट आहेत आणि आता 'दृश्यम 2' देखील या यादीचा एक भाग बनला आहे.

तरण आदर्श यांनी शेअर केले चित्रपटाचे लेटेस्ट कलेक्शन
चित्रपटाचे लेटेस्ट कलेक्शन शेअर करताना, चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर लिहिले - "दृश्यम 2 नॉट आउट आहे. पहिल्या आठवड्यात चित्रपटाने चांगली कमाई केली आहे. आता सर्वांच्या नजरा दुसऱ्या आठवड्याकडे लागल्या आहेत. शुक्रवारी 15.38 कोटी, शनिवार 21.59 कोटी, रविवार 27.17 कोटी, सोमवार 11.87 कोटी, मंगळवार 10.48 कोटी, बुधवारी 9.55 कोटी, गुरुवारी 8.62 कोटी. एकूण 104.66 कोटी," असे त्यांनी सांगितले.

हा चित्रपट 60 कोटींमध्ये बनला आहे

सुमारे 60 कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या 'दृश्यम 2' ने आता रिलीजच्या केवळ सात दिवसांत त्याच्या बजेटच्या जवळपास दुप्पट नफा कमावला आहे. चित्रपटगृहांमध्ये अजूनही हा चित्रपट दमदार कलेक्शन करत आहे.

2022 च्या ओपनिंग वीकेंडमध्ये सर्वाधिक कमाई करणारे हिंदी चित्रपट

या वर्षी प्रदर्शित झालेल्या सर्व हिंदी चित्रपटांपैकी ब्रह्मास्त्रने ओपनिंग वीकेंडला सर्वाधिक कलेक्शन केले होते. ब्रह्मास्त्रने पहिल्या तीन दिवसांत 111 कोटींची कमाई केली होती. दृश्यम 2 ने 64 कोटींच्या कलेक्शनसह दुसरे स्थान पटकावले आहे. भूल भुलैया 2 जवळपास 56 कोटींच्या कलेक्शनसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर सम्राट पृथ्वीराज आणि गंगुबाई काठियावाडी आहेत.

अभिषेक पाठक यांनी सांभाळली दिग्दर्शनाची धुरा
अभिषेक पाठक दिग्दर्शित या चित्रपटात अजय देवगण, तब्बू, श्रेया सरन आणि अक्षय खन्ना यांच्या प्रमुख भूमिका आहेत. चित्रपटाच्या पहिल्या भागाचे दिग्दर्शन निशिकांत कामत यांनी केले होते, परंतु कोविड दरम्यान त्यांचा मृत्यू झाला, त्यामुळे चित्रपटाचे निर्माते अभिषेक पाठक यांनी चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली.

बातम्या आणखी आहेत...