आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअजय देवगण स्टारर 'दृश्यम 2' लवकरच भारतीय बॉक्स ऑफिसवर 200 कोटी क्लबमध्ये सामील होणार आहे. या चित्रपटाने आतापर्यंत 160 कोटींचा गल्ला जमवला आहे. यासह चित्रपटाने आतापर्यंतच्या सर्वाधिक कमाई करणार्या बॉलिवूड सिक्वेल चित्रपटांच्या टॉप-10 यादीत स्थान पटकावले आहे. या यादीत सलमान खान स्टारर 'टायगर जिंदा है' हा चित्रपट पहिल्या क्रमांकावर आहे. 'दृश्यम 2' हा 2015 मध्ये आलेल्या 'दृश्यम' या चित्रपटाचा सिक्वेल आहे.
सर्वाधिक कलेक्शन करणा-या टॉप-10 सिक्वेल चित्रपटांच्या यादीत सामील
सिक्वेल चित्रपटांमध्ये सर्वाधिक कलेक्शन करणाऱ्या टॉप-10 चित्रपटांमध्ये 'दृश्यम 2' सामील झाला आहे. सलमान खानचा 'टायगर जिंदा है' (2017) 339 कोटींच्या कलेक्शनसह पहिल्या क्रमांकावर आहे. 'टायगर जिंदा है' हा सलमानच्या 2012 मध्ये आलेल्या 'एक था टायगर' या चित्रपटाचा सिक्वेल होता.
तरण आदर्श यांनी शेअर केले चित्रपटाचे लेटेस्ट कलेक्शन
दुसऱ्या आठवड्यातही चित्रपटाने जबरदस्त कलेक्शन केले आहे. वीक डेचमध्येही चित्रपटाच्या कमाईचा वेग मंदावलेला नाही, हे विशेष. या चित्रपटाने आतापर्यंत 159 कोटींची कमाई केली आहे. आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर चित्रपटाचे लेटेस्ट कलेक्शन शेअर करताना व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी लिहिले- "दृश्यम 2चा कमाईचा ओघ सातत्याने सुरू आहे. वीक डेजमध्येही चित्रपटाची पकड जबरदस्त आहे. आठवडा-2- शुक्रवार 7.87 कोटी, शनिवार 14.05 कोटी, रविवार 17.32 कोटी, सोमवार 5.44 कोटी, मंगळवार 5.15 कोटी, बुधवारी 4.68 कोटी, एकूण - 159.17 कोटी."
2022 मध्ये जगभरात सर्वाधिक कलेक्शन करणा-या टॉप-5 हिंदी चित्रपटांमध्ये दृश्यम 2 सामील 2022 मधील वर्ल्डवाइड कलेक्शनच्या बाबतीत, 'ब्रह्मास्त्र' 431 कोटींसह पहिल्या क्रमांकावर आहे तर 'द कश्मीर फाइल्स' 341 कोटींसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. भूल भुलैया 2 (266 कोटी) तिसऱ्या क्रमांकावर आहे. आता एकूण 227 कोटींच्या वर्ल्डवाइड कलेक्शनसह, 'दृश्यम 2'ने 'गंगूबाई काठियावाडी'ला (211 कोटी) मागे टाकले आहे.
हा चित्रपट केवळ 60 कोटींमध्ये बनला आहे
'दृश्यम 2'चे बजेट जवळपास 60 कोटी होते. या चित्रपटाने तिसर्याच दिवशीच 64 कोटींचा गल्ला जमवत निर्मिती खर्च वसूल केला होता. अभिषेक पाठक दिग्दर्शित या चित्रपटात अजय देवगण, तब्बू, श्रिया सरन, अक्षय खन्ना आणि इशिता दत्ता मुख्य भूमिकेत आहेत. चित्रपटाच्या पहिल्या भागाचे दिग्दर्शन निशिकांत कामत यांनी केले होते, परंतु कोविड दरम्यान त्यांचे निधन झाले. त्यामुळे चित्रपटाचे निर्माते अभिषेक पाठक यांनी चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.