आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबॉलिवूड चित्रपट 'दृश्यम 2' ने बॉक्स ऑफिसवर 160 कोटींहून अधिकची कमाई केली आहे. या चित्रपटात अजय देवगण, तब्बू, श्रिया सरन आणि अक्षय खन्ना यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. चित्रपटाला मिळालेल्या यशाचा आनंद साजरा करण्यासाठी चित्रपटाच्या टीमने सक्सेस पार्टीचे आयोजने केले होते. या पार्टीत अजय देवगण, तब्बू आणि श्रिया सरनसह अनेक बॉलिवूड स्टार्स सहभागी झाले होते. दरम्यान या पार्टीचा एक व्हिडिओ समोर आला आहे. श्रिया सरन सक्सेस पार्टीमध्ये पांढऱ्या रंगाच्या ड्रेसमध्ये खूपच सुंदर दिसली. तर तब्बू, इशिता दत्ता आणि अजय देवगण ब्लॅक आउटफिटमध्ये दिसले. बॉलिवूड स्टार अनुपम खेर यांनीही या पार्टीला हजेरी लावली.
चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळत आहे
'दृश्यम 2' या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे, त्यामुळे आता प्रेक्षक 'दृश्यम 3'ची मागणी करत आहेत. 18 नोव्हेंबरला 'दृश्यम 2' चित्रपटगृहात दाखल झाला आहे. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी चांगली सुरुवात केली आणि अजूनही तिकिटबारीवर चांगली कामगिरी करत आहे. 50 कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन अभिषेक पाठक यांनी केले आहे. 'दृश्यम 2' हा अजय देवगणच्या 2015 मध्ये आलेल्या 'दृश्यम' चित्रपटाचा सिक्वेल आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.