आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअभिनेता अजय देवगण आणि तब्बू स्टारर 'दृश्यम' या चित्रपटात झळकलेली 32 वर्षीय अभिनेत्री इशिता दत्ता लवकरच आई होणार आहे. अलीकडेच तिने मॅटर्निटी शूट केले आहे. या फोटोशूटचा खास व्हिडिओ अभिनेत्रीने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये तिचा पती वत्सल सेठही दिसत आहे.
फ्लोरल गाऊनमध्ये दाखवला बेबी बंप
व्हिडिओमध्ये इशिता फ्लोरल हाय स्लिट गाऊनमध्ये तिचा बेबी बंप फ्लाँट करताना दिसत आहे. मॅटर्निटी शूटदरम्यान इशिताने वत्सलसोबत वेगवेगळ्या पोज दिल्या. इशिता आणि वत्सल लग्नाच्या सहा वर्षांनी आईबाबा होणार आहेत.
चाहत्यांनी केला शुभेच्छांचा वर्षाव
इशिताच्या या व्हिडिओवर कमेंट करत चाहते आणि सेलिब्रिटी तिला शुभेच्छा देत आहेत. एका यूजरने लिहिले, 'व्वा किती क्यूट दिसत आहे.' आणखी एका युजरने लिहिले की, 'दोघे एकत्र खूप क्यूट दिसत आहेत.' एका चाहत्याने म्हटले, 'खूप सुंदर, तुम्हा दोघांना खूप खूप प्रेम.'
'दृश्यम'मध्ये अजय देवगणच्या मुलीची भूमिका साकारली होती
इशिता ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री तनुश्री दत्ताची बहीण आहे. इशिताने आपल्या करिअरची सुरुवात तेलुगू सिनेसृष्टीतून केली होती. तिच्या पहिल्या चित्रपटाचे नाव 'चाणक्युडु' होते.
बॉलिवूडमध्ये तिने अजय देवगणसोबत 'दृश्यम' या चित्रपटात काम केले. या चित्रपटात तिने अजय देवगणच्या मुलीची भूमिका साकारली होती. इशिता 'दृश्यम 2' मध्ये देखील दिसली होती.
2017 मध्ये वत्सल सेठसोबत केले लग्न
इशिता दत्ताने 2017 मध्ये बॉलिवूड अभिनेता वत्सल सेठसोबत मोठ्या थाटात लग्न केले. आता त्यांच्या लग्नाला 6 वर्षे पूर्ण झाली असून हे जोडपे पहिल्यांदा आई-वडील होणार आहेत. इशिताने टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते की, 'वत्सलसोबत मी पहिल्या नजरेतच प्रेमात पडली नव्हती. आम्ही फक्त मित्र होतो. आम्ही पहिल्यांदा भेटलो तेव्हा मला तो मित्र म्हणून आवडला होता.'
ती पुढे म्हणाली, 'अशा प्रकारे आमचे नाते मैत्रीच्या पलीकडे वाढत गेले. आमचा शो संपल्यानंतरही आम्ही एकमेकांच्या संपर्कात राहिलो. आम्ही एकमेकांना आवडतो, हे समजायला फार काळ लागला नाही. आमची एक अतिशय साधी प्रेमकथा आहे. सहा महिन्यांतच आमचे लग्न झाले.'
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.