आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'दृश्यम 2'चा टिझर रिलीज, पहा VIDEO:विजय साळगावकरच प्रकरण पुन्हा उघडणार, 18 नोव्हेंबरला होणार प्रदर्शित

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अजय देवगणचा मोस्ट अवेटेड चित्रपट 'दृश्यम'चा रिकॉल ट्रेलर रिलीज झाला आहे. व्हिडीओमध्ये 'दृश्यम' चित्रपटातील काही दृश्ये दाखवण्यात आली आहेत आणि शेवटच्या भागात दुसऱ्या भागाची झलक आहे. ज्यामध्ये अजय आपला कबुलीजबाब नोंदवताना दिसत आहे. या चित्रपटात अजय देवगण व्यतिरिक्त अक्षय खन्ना, तब्बू, श्रिया सरन, रजत कपूर आणि इशिता दत्त मुख्य भूमिकेत आहेत.

चित्रपटाचे दिग्दर्शन अभिषेक पाठक यांनी केले आहे. चित्रपट 18 नोव्हेंबर 2022 रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. 2015 मध्ये 'दृश्यम' हा चित्रपट प्रदर्शित झाला होता, ज्याचे दिग्दर्शन निशिकांत कामत यांनी केले होते. अजय, तब्बू, श्रिया, इशिता आणि रजत कपूर यांच्याशिवाय या चित्रपटात मृणाल जाधव, ऋषभ चढ्ढा यांच्याही भूमिका होत्या.

थ्रिलर चित्रपटात विजय साळगावकर म्हणजेच अजय देवगणचे कुटुंब एका गावात आनंदाने राहत असल्याचे दाखवण्यात आले होते. पण त्यांच्या आयुष्यात भूकंप येतो. जेव्हा त्याची पत्नी आणि मोठ्या मुलीने एमएमएस करून धमकावणाऱ्या आणि त्रास देणाऱ्या मुलाचा चुकून खून केला. विजय आपल्या कुटुंबाला वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतो. आता त्याच्या दुसऱ्या भागात कळेल की विजय आणि त्याच्या कुटुंबाला अजूनही धोका आहे की त्याचे रहस्य सर्वांसमोर आले तर तो स्वतःला आणि कुटुंबाला कसे वाचवणार आहे.

बातम्या आणखी आहेत...