आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

रियाच्या भावाचे ड्रग्ज पॅडलर्ससोबत कनेक्शन:शोविक आणि त्याच्या मित्रांमधील ड्रग्ज चॅट उघडकीस, रियाच्या भावाने त्याला पाच ड्रग्ज डीलर्सचे दिले होते नंबर; अटक केलेल्या ड्रग डीलरसोबतही होते संबंध

मुंबई23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
रिया आणि शोविकचा हा फोटो 2016 चा आहे. शोविक सुशांतच्या दोन कंपन्यांमध्ये पार्टनर होता.
  • शोविकला या प्रकरणात अडकत चालला आहे. सॅम्युअल मिरांडानेही एका ड्रग चॅटमध्ये त्याचे नाव घेतले आहे.
  • एनसीबी लवकरच शोविकची चौकशी करेल, असे सांगण्यात येत आहे. सोबतच ईडीने पुन्हा शोविकला चौकशीसाठी समन्स पाठविले आहे.

सुशांत मृत्यू प्रकरणात अनेक ट्विस्ट अँड टर्न आले आहेत. आत्महत्येनंतर आता हे प्रकरण ड्रग्जपर्यंत पोहोचले आहे. ड्रग्ज प्रकरणी रिया चक्रवर्ती आणि तिचे कुटुंब अडकत चालले आहे. रिया आणि तिचा भाऊ शोविक यांचे ड्रग्जसंदर्भातील काही चॅट्स समोर आले असून शोविकने आपल्या वडिलांसाठी ड्रग्ज खरेदी केल्याचे उघड झाले आहे. दरम्यान दिव्य मराठीला 10 ऑक्टोबर 2019 रोजीचे चॅट रेकॉर्ड मिळाले आहेत. ज्यात शोविक त्याच्या एका मित्रासोबत ड्रग्जविषयी बोलत आहे.

10 ऑक्टोबरला झालेल्या या चॅटमध्ये शोविकचा एक मित्र त्याच्याकडे ड्रग्जसाठी मदत मागतो आणि नंतर शोविक त्याला ड्रग्ज विकणा-या पाच लोकांचे नंबर देतो. चॅटमध्ये शोविकचा मित्र त्याला 'वीड', 'हॅश', 'बड' यासारख्या ड्रग्जबद्दल विचारत आहे. शोविक आपल्या मित्राला बड नावाच्या ड्रगसाठी जैद आणि बसित यांचे नंबर देतो. नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोच्या पथकाने गेल्या दोन दिवसांत या चॅटच्या आधारे जैद आणि बसित यांना अटक केल्याचे म्हटले जात आहे.

जे चॅट्स समोर आले आहेत, त्यात शोविक सूर्यदीपच्या रेफरन्सने करमजीत आणि राज नावाच्या व्यक्तीचे नंबर आपल्या मित्राला देतो. यांच्याकडून 'गांजा' मिळू शकेल असे शोविक म्हणतो. या चॅटमध्ये जैद, अब्दुल बसित आणि सूर्यदीप यांच्यातील ड्रग्जचे कनेक्शन उघडकीस आले आहे. या चॅटसंदर्भाक एनसीबी लवकरच शोविकची चौकशी करू शकते.

शोविक आणि त्याचा मित्रातील संभाषणः

मित्र : मदतीची गरज आहे.

शोविक: बोल, कसे होते?

मित्र: पेपर चांगला होता.

येथून दोघांमध्ये ड्रग्ज संभाषण सुरू होते

मित्र : मला हे आत्ता हवे आहे, माझा डीलर नाटक करत आहे. पेपर चांगला होता, फक्त स्पीडवर लक्ष दिले पाहिजे.

शोविक: हॅश आहे ना? थांब, मी विचारतो.

मित्र : ठीक आहे भावा.

शोविकः आजसाठी हवे की उद्यासाठी गरज आहे?

मित्र : जर आता मिळाले, तर मी एकत्र फूंकू. (हे सिद्ध करते की शोविकनेही ड्रग्जचे सेवन केले आहे.)

शोविक: उद्या, मी सध्या शहरात आहे. मी माझ्या विक्रेत्याशी बोलतो आणि सांगतो. आता तू कुठे आहे घरी?

मित्र : हाहा, ठीक आहे, मी खारमध्ये आहे, तो जिथे म्हणेल तिथे मी जाईल. काहीच अडचण नाही.

शोविक: ठीक आहे, मला पाच मिनिटे दे.

मित्र : ठीक आहे.

शोविकः माझा डीलर सध्या उपलब्ध नाही. पण माझा एक मित्र मला काही नंबर पाठवत आहे. 'बड' चांगल्या क्वॉलिटीचे असेल.

मित्र: चालेल. शहरातील या डीलर्सचे काय चालले आहे हे काही समजत नाहीये?

शोविकः जर घाई नसेल तर मी तुझ्यासाठी उद्या चांगले हॅश घेऊन येतो. आत्ता मी गांजा विकणा-याचा नंबर पाठवत आहे.

मित्र: या 'बड'चे किती?

शोविकः 2 ते अडीच हजारादरम्यान.

मित्र: ठीक आहे, मी थांबतो.

शोविक: ठीक आहे, मी काही नंबर पाठवत आहे. (त्यानंतर शोविक त्याच्या मित्राला पाच नंबर पाठवतो. यात जैद आणि अब्दुल बसित यांचा समावेश आहे. त्याने आपल्या मित्राला ड्रग्ज घेण्यास कोड वर्डही सांगितले.)

शोविकः करमजित (केजे), राज नावाचे हे दोन डीलर आहेत. सूर्यदीपचे नाव वापर. 'सूर्यदीप' एक मोठा ड्रग पॅडलर आहे.

मित्र: मी त्याला कॉल करू की मेसेज करू?

शोविक: कॉल कर, जर यांनी फोन उचलले नाही, तर मला सांग. मी तोपर्यंत इतरांसी बोलतो.

मित्र: ठीक आहे.

शोविकः यांना हॅशविषयी विचारशील.

यानंतर थोड्या वेळाने शोविकचा मित्र लिहितो.

मित्र: ठीक आहे, पहिला फोन उचलत नाही, मी राजला कॉल करतो.

शोविकः राजसोबत बोला, नाहीतर मी इतक कुणाशी बोलतो.

मित्र: राजने परत कॉल केला, तो कोणालातरी पाठवत आहे. कदाचित काम होईल.

शोविक: हो काम होईल. राज तुला माल पोचवेल.

मित्र : धन्यवाद भावा.

शोविकः कधीही भावा

मित्र: ठीक आहे, त्याने मला माल दिला, मी अंधेरीला जात आहे माल घ्यायला.

शोविकः ओके.

  • जैद विलात्राला 9 सप्टेंबरपर्यंत कोठडी सुनावण्यात आली

दरम्यान, ड्रग्जच्या संदर्भात अटक करण्यात आलेल्या जैद विलात्रा याला गुरुवारी न्यायालयात हजर करण्यात आले. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) कोर्टाकडे 10 दिवसांच्या रिमांडची मागणी केली. त्यानंतर कोर्टाने जैदला 9 सप्टेंबरपर्यंत कोठडी सुनावली आहे. 1 सप्टेंबर रोजी एनसीबीने मुंबईतून जैद विलात्राला अटक केली होती.

ड्रग्ज प्रकरणात एनसीबीने अब्दुल बसित परिहारलाही अटक केली आहे. एनसीबीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बसित आणि जैद हे सुशांतची मैत्रीण रिया चक्रवर्तीचा सहकारी सॅम्युअल मिरांडाशीही संबंधित आहेत.

  • रियाच्या वडिलांना मुलं ड्रग्ज घेत असल्याची माहिती होती

सुशांतची माजी मॅनेजर श्रुती मोदीचे वकील अशोक सरावगी यांनी सांगितल्यानुसार, रियाचे वडील इंद्रजित चक्रवर्ती यांना त्यांची दोन्ही मुले ड्रग्ज घेत असल्याची माहिती होती.