आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Entertainment
  • Bollywood
  • Sushant Singh Rajput Death Case: Narcotics NCB Drug Angle Investigation Today Update | Sohail Kohli, Director Of Savdhan India, Called For Questioning Today

सुशांत प्रकरणात ड्रग्ज अँगल:सावधान इंडियाच्या दिग्दर्शकाची सलग दुसर्‍या दिवशी NCB कडून चौकशी; रियाच्या भावाची कोठडी आज संपणार

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सुशांत मृत्यू प्रकरणाची चौकशी करणा-या अंमलबजावणी संचालनालयाने बॉलिवूडमधील ड्रग्जशी संबंधित काही चॅट्स रिट्रीव्ह केले होते. त्यानंतर एनसीबीने ड्रग्ज कनेक्शनची चौकशी सुरू केली.

अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणी ड्रग्ज अँगलचा तपास करणार्‍या नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) आज सावधान इंडियाचे दिग्दर्शक सोहेल कोहली यांना पुन्हा चौकशीसाठी बोलावले आहे. सोमवारी त्यांची चौकशी करण्यात आली होती. सोहेल कोहलीने अनेक पंजाबी चित्रपटांमध्येही काम केले आहे.

एनसीबीने 2 दिवसांपूर्वी ड्रग्ज प्रकरणात अर्जुन रामपालचा मेहुणा आणि गॅब्रिएला डेमेट्रिएड्सचा भाऊ अगिसिलयाओस डेमेट्रिएड्स याला अटक केली होती. एनसीबीने आतापर्यंत ड्रग्ज प्रकरणात रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शोविक चक्रवर्ती यांच्यासह 23 जणांना अटक केली आहे. आज, शोविकची न्यायालयीन कोठडी देखील संपत आहे. शोविक पुन्हा एकदा आपले वकील सतीश मानशिंदे यांच्यामार्फत जामीन मिळवण्यासाठी प्रयत्न करु शकतो.

दीपेश सावंतने एनसीबीकडे दहा लाखांची नुकसान भरपाई मागितली

सुशांतच्या घरातील कर्मचारी दीपेश सावंत याने एनसीबीवर बेकायदेशीर अटकेत ठेवणे आणि मानसिक छळ केल्याचा आरोप करत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. दीपेशने एनसीबीकडे दहा लाख रुपयांची नुकसान भरपाई मागितली आहे. या खटल्याची सुनावणी 6 नोव्हेंबर रोजी होईल. दीपेशवर ड्रग पेडलर्सशी संवाद साधून सुशांतला ड्रग्स पोचविल्याचा आरोप आहे.

अनेक सेलिब्रिटींची चौकशी झाली आहे

बॉलिवूडमध्ये ड्रग्ज अँगलची तपासणी करणार्‍या नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने अभिनेत्री दीपिका पदुकोण, सारा अली खान, रकुलप्रीत सिंग आणि श्रद्धा कपूर यांना समन्स बजावून त्यांना चौकशीसाठी बोलावले होते. या पथकाने रिया चक्रवर्ती, तिचा भाऊ शोविक, सुशांतचा मॅनेजर सॅम्युअल मिरांडा, दीपेश सावंत, ड्रग पेडलर जैद, बासित परिहार, धर्मा प्रोडक्शनचे माजी निर्माता क्षितिज रवि प्रसाद यांच्यासह 23 जणांना अटक केली आहे. महिनाभर तुरुंगात राहिल्यानंतर रिया चक्रवर्ती सध्या जामिनावर बाहेर आहे.

बातम्या आणखी आहेत...