आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
अभिनेता सुशांत सिंह राजपूतला ड्रग्ज पुरवल्याच्या आरोपाखाली नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोने (एनसीबी) कथितरित्या एका ड्रग पेडलरला अटक केली आहे. सुशांत सिंह राजपूत याला ड्रग्ज पुरवणा-या एका व्यक्तीसह दोन विदेशी नागरिकांना अटक करण्यात आल्याची माहिती एनसीबीचे प्रमुख समीर वानखेडे यांनी सोमवारी दिली.
हेमंत शहा उर्फ महाराज असे सुशांतला ड्रग्ज पुरवणा-या व्यक्तीचे नाव आहे. सुशांत ड्रग्स प्रकरणात अटक केलेले अनुज केसवानी आणि रीगल महाकाल यांनीही चौकशी दरम्यान हेमंतचे नाव घेतले होते. एनसीबीने काही दिवसांपूर्वी या दोघांविरूद्ध आरोपपत्र दाखल केले आहे. हेमंत हा मुळचा मध्य प्रदेशातील असून गेल्या काही वर्षांपासून तो गोव्यात व्यवसाय करत होता. पोलिसांनी त्याच्या घरावर छापा टाकला आणि तेथून एलएसडी आणि 30 ग्रॅम चरस जप्त करण्यात आली आहे.
गोव्यातून मोठ्या प्रमाणात ड्रग्ज जप्त केले
एनसीबीच्या गोवा सब झोनल युनिट आणि मुंबई एनसीबीच्या एका ऑपरेशनल टीमने माजल वाडो, असगाव येथे 7 आणि 8 मार्चच्या रात्री छापा टाकला आणि मोठ्या प्रमाणात ड्रग्ज जप्त केले. त्यापैकी एलएसडी (कमर्शिअल क्वांटीटी), चरस 28 ग्रॅम, कोकेन 22 ग्रॅम, गांजा 1.1 किलो आणि 160 ग्रॅम सायकोट्रॉपिक पदार्थ जप्त केले आहेत. याव्यतिरिक्त, 500 ग्रॅम ब्लू क्रिस्टल सायकोट्रॉपिक पदार्थही जप्त करण्यात आला आहे.
याच प्रकरणात ड्रग पॅडलरसह दोन विदेशी नागरिक उगोचुकू सोलोमन उबाबुको (नायजेरिया) आणि जॉन इनफिनिटी डेव्हिड (कांगो) यांना अटक केली आहे. त्यांच्याजवळून 10 हजार रुपयांचे भारतीय चलनही जप्त केले आहे.
सुशांतचे प्रकरण एनसीबीकडे कसे आले?
सुशांतच्या मृत्यूच्या दोन महिन्यांनंतर त्याच्या वडिलांनी पाटण्यात गुन्हा दाखल केला. ही तक्रार सुशांतची गर्लफ्रेंड रिया आणि तिच्या कुटुंबातील सदस्यांसह 5 जणांविरूद्ध होती. या सर्वांवर सुशांतचे 17 कोटी रुपये हडपल्याचा आरोप होता. यानंतर हे प्रकरण मुंबईत हस्तांतरित करण्याची विनंती रियाने सर्वोच्च न्यायालयात केली होती.
कोर्टाने हा खटला सीबीआयकडे सोपवला. नंतर या प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाचा (ईडी) प्रवेश झाला आणि रियाच्या व्हॉट्सअॅप चॅटच्या तपासणीत ड्रग्ज अँगल समोर आला. ड्रग्जसंदर्भात चॅट मिळाल्यानंतर नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोकडे हे प्रकरण गेले आणि बॉलिवूडमध्ये चालणार्या मोठ्या ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश झाला.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.