आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पप्पा 'शाहरुख' असण्याचे तोटे:वडील शाहरुख खानला भेटण्यासाठी घ्यावी लागते अपॉइंटमेंट, आर्यन खानचा NCB अधिकाऱ्यांसमोर धक्कादायक खुलासा

11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • वडिलांना भेटण्यासाठी आपल्याला अपॉइंटमेंट घ्यावी लागते, असे आर्यनने सांगितले आहे.

क्रूझ ड्रग्ज प्रकरणी बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानसह आठ आरोपींना 7 ऑक्टोबरपर्यंत एनसीबी कोठडी सुनावण्यात आली आहे. एनसीबीच्या चौकशीत आर्यन खानने एक धक्कादायक खुलासा केला आहे. वडील शाहरुख खानच्या बिझी शेड्युलमुळे त्याला भेटण्यासाठी त्याची मॅनेजर पूजाकडून अपॉइंटमेंट घ्यावी लागते, असा खुलासा आर्यनने चौकशीदरम्यान केला आहे.

सध्या शाहरुख खान त्याच्या अनेक आगामी प्रोजेक्टवर एकाच वेळी काम करत आहे. त्यामुळे सध्या तो खूप जास्त बिझी आहे. अशा परिस्थितीत, त्याच्या मुलांना देखील त्याला भेटण्यासाठी अपॉइंटमेंट द्यावी लागते. आर्यनने NCB ला सांगितले की, त्याने परदेशातून फिल्ममेकिंगचा कोर्स पूर्ण केला आहे.

शाहरुख सध्या अनेक चित्रपटांचे शूटिंग करत आहे.
आर्यनने एनसीबीला चौकशी दरम्यान त्याचे वडील शाहरुखच्या व्यस्त वेळापत्रकाबद्दल माहिती दिली. सूत्रांनुसार, आर्यनने सांगितले की त्याचे वडील सध्या अनेक चित्रपटांचे शूटिंग करत आहे. आर्यनने सांगितले की, शाहरुख त्याच्या आगामी 'पठाण' चित्रपटासाठी खूप मेहनत घेत आहे. 'पठाण' मधील भूमिकेसाठी शाहरुखला अनेक तास मेकअपमध्ये राहावे लागते.

दिल्ली NCB ची टीम 4 लोकांसह मुंबईत दाखल
आता दिल्लीतील एनसीबीचे एक पथक चार लोकांना घेऊन मंगळवारी एनसीबीच्या मुंबई कार्यालयात पोहोचले आहे. या चौघांनाही एनसीबीकडून अटक झाल्याचे समजते. मात्र अद्याप एनसीबीकडून याची पुष्टी करण्यात आलेली नाही. आतापर्यंत केवळ 11 जणांना अटक झाल्याची पुष्टी एनसीबीकडून करण्यात आली आहे. यामध्ये आर्यनसह क्रूझवर हजर आठ जण, अरबाज मर्चंटचा मित्र श्रेयस आणि जोगेश्वरी येथून एक जण आणि ओडिशातून एकाला अटक झाली आहे. आर्यन व्यतिरिक्त अरबाज मर्चंट, मुनमुन धामेचा, नुपूर सतिजा, इश्मीत चड्ढा, मोहक जैस्वाल, गोमित चोप्रा, विक्रांत छोकर आणि दोन ड्रग पॅडलर देखील या प्रकरणात एनसीबीच्या ताब्यात आहेत.

आर्यनसमोर बसून ड्रग पॅडलरची चौकशी केली जाईल
तपास यंत्रणेने याच प्रकरणात एका ड्रग पॅडलरसह श्रेयस नायर नावाच्या व्यक्तीला अटक केली आहे. या दोघांवर रेव्ह पार्टीसाठी ड्रग्ज पुरवल्याचा आरोप आहे. श्रेयस हा अरबाजचा खूप चांगला मित्र असल्याचे म्हटले जाते आणि त्याच्याकडून मोठ्या प्रमाणात ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे. आज या दोघांची आर्यन, अरबाज आणि मुनमुनसह 8 आरोपींसमोर बसून चौकशी होण्याची शक्यता आहे. या प्रकरणात, NCB इतर काही ठिकाणी देखील छापे टाकू शकते. आज त्यांना कोठडीसाठी किल्ला न्यायालयात हजर केले जाईल. याच प्रकरणात एनसीबीने क्रूझच्या 8 कर्मचाऱ्यांनाही ताब्यात घेतले आहे. त्यांच्यावर पार्टीची माहिती जाणूनबुजून लपवल्याचा आरोप आहे. असे मानले जाते की त्यापैकी काहींना आज अटक केली जाऊ शकते.

आर्यनवर आहेत हे आरोप
आर्यन खान याच्यावर एनडीपीसी 8 क, 20 ब, आणि कलम 35 अंतर्गंत कारवाई करण्यात आली आहे. या गुन्ह्याप्रकरणी 1 वर्ष कारावास आणि 20 हजार रुपये दंड ठोठावला जाऊ शकतो. ही रेव्ह पार्टी मुंबई ते गोवा या मार्गावर क्रुझवर आयोजित करण्यात आली होती. सूत्रांच्या माहितीनुसार, आर्यन खानजवळून 13 ग्रॅम कोकेन, पाच ग्रॅम एमडी, 21 ग्रॅम चरस आणि एमडीएमएच्या 22 गोळ्या मिळाल्या. त्याची किंमत अंदाजे 1 लाख 33 हजार रुपये इतकी आहे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आर्यन खानने ड्रग्जचे सेवन केल्याची कबुली दिली आहे, मात्र ड्रग्ज खरेदी केल्याचा त्याने इंकार केला आहे.

बातम्या आणखी आहेत...