आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Entertainment
  • Bollywood
  • Drugs In Bollywood: Narcotics Control Bureau Arrested Three People Including Dia Mirza's Former Manager For Trying To Smuggle 200 Kg Marijuana

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बॉलिवूड ड्रग्ज प्रकरण:दीया मिर्झाची माजी मॅनेजर राहिला फर्नीचरवालासह तीन जणांना अटक, NCB ने 200 किलो गांजा केला जप्त

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • या कारवाईत एकुण 200 किलो गांजा जप्त करण्यात आला आहे.

बॉलिवूड ड्रग्ज कनेक्शन प्रकरणात एनसीबीने दीया मिर्झाच्या माजी मॅनेजर राहिला फर्नीचरवालाला अटक केली आहे. तिच्यासह तिची बहीण शाहिस्ता आणि ब्रिटिश नागरिक करण सजनानी यांनाही एनसीबीने ताब्यात घेतले आहे. या कारवाईत एकुण 200 किलो गांजा जप्त करण्यात आला आहे.

रिपोर्ट्सनुसार, एनसीबीने या प्रकरणावर म्हटले आहे की, माहितीच्या आधारे वांद्रे वेस्टमधून कुरिअरमध्ये गांजा सापडला. त्यानंतर एका कारवाईत ब्रिटिश नागरिक असलेल्या करण सजनानी याच्या घरातूनही मोठ्या प्रमाणात गांजा जप्त करण्यात आला. त्या कारवाई दरम्यानच एनसीबीला आधिक माहिती मिळाली त्यात राहिला फर्निचरवालाचे नाव पुढे आले. त्यावेळी राहिला फर्निचरवाला आणि तिची बहिण शाहिस्ता यांच्याकडे गांजा सापडला.

सजनानी ग्राहकांना ड्रग्ज पाठवणार होता
रिपोर्टनुसार, करण सजनानी बंदी असलेले ड्रग्ज पॅक करुन तो मुंबईतील वेगवेगळ्या ठिकाणी ग्राहकांना पाठवणार होता. तो सुशांत सिंह राजपूत प्रकरणाशी संबंधित असून अनुज केसवानीचा सप्लायर आहे. केसवानीला एनसीबीने याआधीच अटक केली आहे.

बॉलिवूड ड्रग्ज प्रकरणाचा तपास सातत्याने सुरु
बॉलिवूडचे ड्रग्ज कनेक्शन ऑगस्ट 2020 मध्ये उघडकीस आले होते. खरं तर, 14 जून रोजी सुशांत सिंह राजपूत मुंबईतील त्याच्या भाड्याच्या घरात मृतावस्थेत आढळला होता. सुमारे दीड महिन्यानंतर, त्याचे वडील के.के. सिंह यांनी रिया चक्रवर्ती आणि तिच्या कुटुंबीयांविरुद्ध पाटण्यात एफआयआर दाखल केला. सिंह यांनी रियावर सुशांतला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आणि त्याच्या बँक खात्यातून 15 कोटी रुपयांचा गैरव्यवहार केल्याचा गुन्हा दाखल केला होता. नंतर हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात आले. अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) रिया आणि तिच्या कुटुंबातील सदस्यांसह 6 जणांविरोधात मनी लाँडरिंगचा गुन्हा दाखल करुन चौकशी सुरु केली होती. दरम्यान ऑगस्टच्या महिन्याच्या शेवटी एक ड्रग्ज कनेक्शन उघडकीस आले आणि नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) रियाविरूद्ध गुन्हा नोंदविला आणि तपास सुरू केला. 8 सप्टेंबर रोजी तिची चौकशी करुन एजन्सीने तिला अटक केली होती. 30 दिवस तुरूंगात राहिल्यानंतर 7 ऑक्टोबर रोजी मुंबई उच्च न्यायालयाने रियाला जामीन मंजूर केला होता.

या प्रकरणात अनेक दिग्गजांची नावे समोर आली

ड्रग्ज प्रकरणाचा तपास सुरु असताना रियाच नव्हे तर तिचा भाऊ शोविक चोक्रवर्ती, अभिनेत्री दीपिका पदुकोण, श्रद्धा कपूर, सारा अली खान, रकुल प्रीत सिंह, अभिनेता अर्जुन रामपाल, कॉमेडियन भारती सिंह आणि तिचा नवरा हर्ष लिंबाचिया यांच्यासह मनोरंजन क्षेत्राशी संबंधित अनेक नावे यात समोर आली. एनसीबीनेही सर्वांची चौकशी केली. रिया, शोविक, भारती आणि हर्ष यांना चौकशी एजन्सीने अटक केली होती, नंतर त्यांची जामिनावर सुटका झाली. याप्रकरणी 30 ड्रग्ज पेडलरर्सनाही एनसीबीने अटक केली होती.

सुशांतचा निकटवर्तीय ऋषिकेश पवारचा शोध सुरु
एनसीबी याप्रकरणी आता सुशांतचा निकटवर्तीय आणि सहायक दिग्दर्शक ऋषिकेश पवारचा शोध घेत आहे. तो आपल्या घरातून बेपत्ता आहे. अनेकदा समन्स पाठवूनही तो चौकशीसाठी तपास यंत्रणेसमोर हजर झाला नाही. एका ड्रग सप्लायरने ऋषिकेशचे नाव उघड केले होते. याशिवाय सुशांतचा हाऊस मॅनेजर दीपेश सावंत यानेही ऋषिकेश सुशांतसाठी ड्रग्ज आणत असल्याचा दावा केला होता.

बातम्या आणखी आहेत...